अनोखा उत्सव, इथे महिलांना मिळते हवे तेवढे पती निवडण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 03:46 PM2019-12-21T15:46:32+5:302019-12-21T15:52:50+5:30

या जगात वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या प्रथा परंपरा अस्तित्वात आहेत. अशीच एक विचित्र वाटेल अशी प्रथा आफ्रिकेतील नायजर या देशामधील वोडाबे या आदिवासी समुदायामध्ये प्रचलित आहे. इथे पुरुषांची सौंदर्य स्पर्धा आयोजित होते. तसेच या स्पर्धेत महिला परीक्षकाच्या भूमिकेत असतात. परीक्षक महिला सर्वात आकर्षक ठरणाऱ्या पुरुषसोबत शरीरसंबंध ठेवू शकते. तसेच इच्छा झाल्यास त्याच्याशी विवाहसुद्धा करू शकते. जरी संबंधित महिला विवाहित असली तरी तिला याबाबत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते.

वोडाबे आदिवासी समुदायामध्ये दरवर्षी गुएरेवोल महोत्सवाचे आयोजन होते. या महोत्सवामध्ये पुरुष सजून महिला परीक्षकांसमोर नृत्य करतात.

वोडाबे आदिवासी समुदाय हा पितृसत्ताक आहे. मात्र शरीरसंबंधांच्या बाबतीत या समुदायामध्ये महिलांचे मत महत्त्वाचे मानले जाते. त्यमुळे या समुदायात एकापेक्षा अधिक जोडीदार ठेवण्याचे स्वातंत्र आहे. विवाहित महिलासुद्धा वाटल्यास एकापेक्षा अधिक पुरुषासोबत शरीरसंबंध ठेवू शकते. तसेच एकापेक्षा अधिक पतींची निवड करू शकते.

गुएरेवेल महोत्सवाला पत्नी चोरणारा महोत्सव म्हणूनसुद्धा ओळखले जाते. कारण येथील स्पर्धेत सहभाग घेणारे पुरुष आपल्या आवडत्या महिलेला संकेत देते. त्यानंतर संबंधित विवाहित महिला इच्छा झाल्यास त्या पुरुषासोबत जाऊ शकते.

वोडाबे आदिवासी समुदायात महिला विवाहापूर्वी शरीरसंबंध ठेवू शकतात. तसेच विवाहानंतरसुद्धा एकापेक्षा अधिक पतींसोबत राहू शकतात.