united airlines charter flights move shipments pfizer covid 19 vaccines
अमेरिकेत कोरोना लसीची चार्टर फ्लाइटमधून डिलिव्हरी सुरू, तयार केले सुटकेस सारखे बॉक्स By ravalnath.patil | Published: November 28, 2020 04:30 PM2020-11-28T16:30:42+5:302020-11-28T16:50:46+5:30Join usJoin usNext अमेरिकेत कोरोना लस वितरणासाठी चार्टर फ्लाइट्स सुरू करण्यात आली आहेत. फायझरची कोरोना लस युनायटेड एअरलाइन्सच्या विमानाने एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी पाठविली जात आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी फायझरने म्हटले आहे की, त्याची कोरोना लस 95 टक्के प्रभावी आहे. फायझर कंपनीच्या योजनेनुसार, अमेरिकेतील लसीकरण केंद्राच्या अगदी जवळपर्यंत फ्लाइट्समधून लस वितरीत केली जाईल. मात्र, वितरण केंद्रापासून लसीकरण केंद्रापर्यंत कोरोना लस पोहोचण्यास तीन दिवसांचा कालावधी लागू शकतो. वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, जागतिक पुरवठा आणि वितरणासाठी फ्लाइटमधून लस पाठविणे ही एक महत्त्वपूर्ण तयारी आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये अमेरिकेत लसीकरण सुरू केले जाईल, अशी अपेक्षा आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून लवकरच या लसीला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. युनायटेड एअरलाइन्सलाही लस पुरवण्यासाठी फ्लाइट्समध्ये अतिरिक्त बर्फ ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. फायझरची लस उणे 70 डिग्री सेल्सियसवर ठेवावी लागते. लसीच्या पुरवठ्यासाठी फायझरने सूटकेसच्या आकाराचे बॉक्स तयार केले आहेत. फायझरने याआधी सांगितले होते की, अमेरिका आणि युरोपमधील कंपनीच्या स्टोअरमध्ये आधीपासूनच लसीचे लाखों डोस तयार आहेत. त्यामुळे वितरणाची तयारी केली जात आहे. जेणेकरुन या लसीला मंजुरी मिळाताच सुरू होऊ शकेल. कंपनी दररोज 20 फ्लाइटमधून लस वितरीत करू शकते.टॅग्स :कोरोना वायरस बातम्याअमेरिकाcorona virusAmerica