In the United States, Don Ward is making around 64 thousand rupees a day by polishing shoes
काम बूट पॉलिशचं, पण दिवसाची कमाई ऐकाल तर चक्रावून जाल! By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 09:14 PM2020-02-28T21:14:01+5:302020-04-26T16:12:26+5:30Join usJoin usNext जगभरात विविध प्रकराचे काम करुन पैसे कमवले जातात. भारतात एखादा बूट पॉलिश करणार व्यक्ती महिन्याला जवळपास 9 ते 10 हजार रुपये कमवत असतो. तसेच जास्तीत जास्त बघायला गेलो तर 12 हजार पर्यत महिन्याची कमाई देखील बूट पॉलिश करणारा कमवत असेल. अमेरिकेतील मॅनहॅटन शहरात राहणारी एक व्यक्ति फक्त बूट पॉलिश करुन दरदिवशी जवळपास 900 डॉलर अर्थात 64 हजार रुपयांची कमाई करत आहे. अमेरिकेतील डॉन वार्ड या नावाचा दरदिवशी बूट पॉलिश करुन 900 डॉलर अर्थात जवळपास 64 हजार रुपयांची कमाई करतो. त्यामुळे महिन्याला बघायला गेलो तर सरासरी 17 ते 19 लाख रुपयांची कमाई डॉन वार्ड करतो. डॉन वार्डने जेव्हा सुरुवातीला आपल्या कमाईबद्दल लोकांना सांगितले, तेव्हा कुणालाही विश्वास बसला नाही. आता तर लोक त्याची कमाईची ट्रिक ऐकून फॅन होत आहेत. डॉन वार्ड पूर्वी एका फोटो लॅबमध्ये तो आधी काम करत होता. त्या ठिकाणी मिळणाऱ्या पैशातून तो समाधानी नव्हता. त्यामुळे काम करण्यासाठी डोक्याचा वापर करुन बूट पॉलिश किट घेऊन डॉन वार्ड रस्त्यावर उतरला. बूट पॉलिशने कमाई करण्यासाठी डॉन एक अनोखी शक्कल वापरतो. तो सर्वप्रथम दररोज आपल्या दुकानासमोरून जाणाऱ्या लोकांच्या बूटांवर वाईट कमेंट करतो. रस्त्यांवरुन जाणाऱ्या लोकांशी बातचीत करताना डॉन त्यांच्या बूटांबद्दल सांगताना खूप खराब झाले आहे, तुमचे बूटाला खूप धूळ बसली आहे असं सांगत असतो. यानंतर काही लोकं रागवून तर काहीजण आपला अहंकार दुखावल्यामुळे वेळीच बूट पॉलिश करतात. डॉनच्या अनेक टीव्ही चॅनल आणि दैनिकांनी सुद्धा मुलाखती घेतल्या आहेत. आता डॉनचे असेही काही ग्राहक बनले आहेत जे रोज न चुकता बूट पॉलिश करून घेतात.टॅग्स :व्यवसायअमेरिकाभारतbusinessAmericaIndia