COVID Vaccine For Children: अमेरिकेत १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना देणार Covaxin?; मागितली परवानगी By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2021 06:02 PM 2021-11-06T18:02:21+5:30 2021-11-06T18:17:02+5:30
COVID Vaccine For Children: बुधवारीच जागतिक आरोग्य संघटनेतर्फे Covaxin च्या आपात्कालिन वापरास परवानगी देण्यात आली आह. १७ देशांनी यापूर्वी लसीच्या वापरास मंजुरी दिली आहे. COVID Vaccine For Children: बुधवारीच जागतिक आरोग्य संघटनेतर्फे (WHO) Covaxin च्या आपात्कालिन वापरास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, अमेरिकन फार्मा कंपनी ओक्युझेननं (Ocugen) शुक्रवारी घोषणा केली की त्यांनी २ ते १८ या वयोगटातील मुलांना कोव्हॅक्सिनचे डोस देण्याची परवानगी मागितली आहे.
कंपनीनं अमेरिकन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे ही परवानगी मागितली आहे. ही कोरोना प्रतिबंधात्मक लस भारत बायोटेकने (Bharat Biotech) विकसित केली आहे.
भारत बायोटेक ने कोवॅक्सिन भारतात विकसित केले आहे. या लसीला बुधवारीच जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) आपत्कालीन मंजुरी मिळाली आहे. जगातील 17 देशांमध्ये याला आधीच मान्यता देण्यात आली आहे. या लसीचे लाखो डोस युनायटेड स्टेट्सबाहेर, विशेषतः भारतात प्रौढांना दिले गेले आहेत.
मंजुरीसाठी हा अर्ज भारत बायोटेकद्वारे भारतात २ ते १८ या वयोगटातील करण्यात आलेल्या ५२६ मुलांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाच्या चाचणीवर अवलंबून आहे.
भारत बायोटेकनं दिलेल्या माहितीनुसार लहान मुलांमध्ये तेवढाच अँटीबॉडी रिस्पॉन्स पाहायला मिळाला जितका भारतात १८ वर्षांवरील लोकांच्या चाचण्यांमध्ये पाहायला मिळाला होता. नुकतीच भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेनं आपात्कालिन वापरास मंजुरी दिली होती.
कोव्हॅक्सिनमध्ये पोलियो लसीप्रमाणेच मुलांना देण्यात येणाऱ्या अन्य वेरो सेल मॅन्युफॅक्चरिंग प्लॅटफॉर्मचा वाप करण्यात आला आहे. कोव्हॅक्सिन अनेक अँटिजेनविरोधात अँटिबॉडी तयार करते.
भारतात कोव्हॅक्सिनच्या करण्यात आलेलेल्या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात कोरोना विरोधात उत्तम इम्युनिटी तयार झाल्याचं दिसून आलं होतं. याशिवाय मुलांवरील दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीदरम्यान कोणत्याही प्रकारची गंभीर घटना किंवा रुग्णालयात दाखल करण्यासारखी स्थिती निर्माण झाली नसल्याचंही दिसून आलं आहे.
भारतात कोव्हॅक्सिनच्या करण्यात आलेलेल्या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात कोरोना विरोधात उत्तम इम्युनिटी तयार झाल्याचं दिसून आलं होतं. याशिवाय मुलांवरील दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीदरम्यान कोणत्याही प्रकारची गंभीर घटना किंवा रुग्णालयात दाखल करण्यासारखी स्थिती निर्माण झाली नसल्याचंही दिसून आलं आहे.
भारत बायोटेक आणि ICMR नं कोव्हॅक्सिनची निर्मिती केली आहे. ही संपूर्णपणे स्वदेशी लस आहे. वैद्यकीय चाचणीमध्ये ही लस तब्बल ७८ टक्के प्रभावी असल्याचं सिद्ध झालं आहे.
भारत बायोटेकनं १८ वर्षांपेक्षा कमी बयोगटातील मुलांवरही लसीची चाचणी पूर्ण केली आहे. भारतातील औषध नियामक संस्था ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं मुलांना ही लस देण्यास मंजुरीही दिली आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक स्वदेशी Covaxin लस घेतलेल्यांना आता अमेरिकेत प्रवास करता येणार आहे. याबाबत अमेरिकेच्या प्रशासनानं हिरवा झेंडा दाखवला आहे. त्यामुळे आता कोव्हॅक्सिन घेतलेल्या प्रवाशांसाठी अमेरिकावारी करणं शक्य होणार आहे.
सीडीसीचा ट्रॅव्हल गाईडन्स एफडीएद्वारे स्वीकृत किंवा अधिकृत आणि जागतिक आरोग्य संघटनेद्वारे इमरजन्सी यूज लिस्टमध्ये सामील केलेल्या लसींवर लागू होतं. यामध्ये कोणत्याही नव्या लसीचा समावेश केला तर तो काही वेळानं गाईडन्समध्ये जोडला जातो, अशी माहिती सीडीसीचे प्रेस अधिकारी स्कॉट पॉली यांनी दिली. ८ नोव्हेंबरपासून कोव्हॅक्सिनचे दोन्ही डोस घेतलेल्यांना अमेरिकेत प्रवेश दिला जाणार आहे.
मागील आठवड्यात जागतिक आरोग्य संघटनेच्या तांत्रिक सल्लागार समितीने भारतातील स्वदेशी लस कोव्हॅक्सिन (Covaxin)ला आपत्कालीन वापरासाठी यादीत टाकण्यासाठी अतिरिक्त माहिती मागवली होती. या माहितीच्या आधारे बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.