US presidential election joe biden personal story and career
US Election: खरंच, ज्यो बायडन यांना महिलांच्या केसांचा वास घेण्याची सवय आहे? By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2020 05:20 PM2020-11-02T17:20:21+5:302020-11-02T17:36:15+5:30Join usJoin usNext अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी उद्या 3 नोव्हेंबरला मतदान होत आहे. या निवडणुकीत ज्यो बायडन हे डोनाल्ड ट्रम्प यांना काट्याची टक्कर देत आहेत. या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्ष पदासाठी उभे असलेले उमेदवार ज्यो बायडन यांच्या खासगी आयुष्यावरही प्रचंड चर्चा होत आहे. माध्यमांतूनही त्यांच्या खासगी आयुष्यावर भाष्य केले जात आहे. बीबीसीने दिलेल्या एका वृत्तानुसार, ज्यो बायडन यांचे विरोधक सांगतात, की ते आपल्या भाषणात खोटे दावे करतात. या शिवाय, बायडन यांना महिलांच्या केसांचा वास घेण्याचीही वाईट सवय, असल्याचे म्हणत चिंता व्यक्त केली जात आहे. एक्सप्रेस डॉट यूकेच्या एका वृत्तात यासंदर्भात भाष्य करण्यात आले आहे, की महिलांप्रति असलेल्या बायडन यांच्या भावनेनेही त्यांचा भूतकाळ खराब केला आहे. एवढेच नाही, तर बायडन यांनी सार्वजनिक ठिकाणी आपल्या केसांना स्पर्ष करत कानात फुसफुस करून अस्वस्थ केले, असे सांगण्यासाठीही अनेक महिला समोर आल्या आहेत. 2014 मध्ये नेवादाच्या लेफ्टनंट गव्हर्नर लुसी फ्लोर्स यांनी, बायडन यांच्या मुळे आपल्याला एका भाषणादरम्यान कशा प्रकारे अस्वस्थ झाले. हे अमेरिकन प्रकाशन 'द कट'मध्ये लिहिलेल्या एका लेखात सांगितले होते. त्या म्हणाल्या होत्या, 'मला माझ्या खांद्यावर दोन हात असल्यासारखे वाटले. ते पाहिल्यानंतर मी अक्षरशः स्तब्ध झाले, की अमेरिकेचे उपराष्ट्रपती मला का स्पर्ष करत आहेत. तसेच ते मागून माझ्या जवळ आल्याचे आणि माझ्या केसांना गोंजारत असल्याचेही मला जाणवले. संबंधित वृत्तानुसार, गेल्यावर्षी आठ महिलांनी पुढे येत ज्यो बायडन यांच्यावर असभ्य स्पर्श, आलिंगन आणि चुंबन घेतल्याचे आरोप केले होते. तसेच अमेरिकेतील काही वृत्त वाहिन्यांनी ज्यो बायडन यांच्या काही क्लिप्सदेखील दाखवल्या होत्या. यात ते सभांमध्ये महिलांशी अगदी जवळून संवाद साधताना दिसत आहेत. या क्लिप बघितल्यानंतर ते काही महिलांच्या केसांचा वास घेत आहेत, असेही जानवते. बायडन यांनी अनेक वेळा या आरोपांचे उत्तर दिले आहे. एकदा बायडन म्हणाले होते, की आपण भविष्यात महिलांचे अभिवादन करताना अधिक खबरदारी बाळगू. मार्च महिन्यात अमेरिकन अभिनेत्री तारा रीड यांनीही बायडन यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. तीस वर्षांपूर्वी बायडन यांच्या ऑफिसमध्ये काम करत असताना त्यांनी आपला लैंगिक छळ केला होता, असेही रिड यांनी म्हटले आहे. बायडन यांनी तारा रीड यांच्या आरोपांचे खंडन केले आहे. तसेच त्यांच्या प्रचार टीमनेही, असे काही घडलेले नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे. ज्यो बायडन यांच्या समर्थकांनी म्हटले आहे, की लोकांशी जवळीक करण्याची बायडन यांची एक विशेष पद्धत आहे. एवढेच नाही, तर ज्यो बायडन यांना जगातील सर्वाधिक अनुभवी राजकीय नेत्यांपैकी एक मानले जाते. त्यांना दांडगा राजकीय अनुभव आहे. ओबामा यांच्या कार्यकाळात ते अमेरिकेचे उपराष्ट्रपतीही होते. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ज्यो बायडन डोनाल्ड ट्रम्प यांच्या समोर आहेत. अनेक सर्वेक्षणांत ते ट्रम्प यांच्या पुढे आहेत. एनबीसी न्यूज आणि वॉल स्ट्रीट जर्नल यांनी राष्ट्रीय स्तरावर केलेल्या निवडणूक सर्वेक्षणात बायडन यांना 52 टक्के लोकांना समर्थन दिले आहे, तर ट्रम्प यांना 42 टक्के लोकांनी समर्थन दिले आहे. मात्र उद्या म्हणजेच 3 नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानात कुणाचे पारडे जड राहणार हे पाहणे अत्यंत औत्सुक्याचे आहे. मात्र, व्होटिंग डेपूर्वीच आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी मेल-इन व्होटच्या माध्यमाने मतदान केले आहे. ज्यो बायडन.टॅग्स :ज्यो बायडनअमेरिकाडोनाल्ड ट्रम्पAmerica ElectionJoe BidenAmericaDonald TrumpUSUS Election