Video: अंतराळात खळबळ उडाली! पृथ्वीवर एकाचवेळी पाच UFO दिसले; रशियाने टिपले By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 02:33 PM 2020-08-24T14:33:21+5:30 2020-08-24T14:41:11+5:30
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन अंटार्टिकावरून जात होते, तेव्हा इवान टाईमलॅप्स व्हिडीओ बनवत होता. याचवेळी त्याला अरोरा ऑस्ट्रेलिस (पाच अज्ञात लाईट) दिसायला लागली. पृथ्वीवरील अंतराळामध्ये एकाचवेळी पाच एलियन शिप म्हणजेच युएफओ (UFO) पाहिल्याचा दावा करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमधून एका रशियन अंतराळवीराने याचा व्हिडीओ काढला आहे. काही सेकंदांत हे परग्रहवासी यान तेथून गायब झाल्याचा दावा या अंतराळवीराने केला आहे.
रशियन कॉस्मोनॉट इवान वैगनर ने ही यान पाहिली आहेत. रशियामध्ये अंतराळवीराला कॉस्मोनॉट्स म्हटले जाते.
जेव्हा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन अंटार्टिकावरून जात होते, तेव्हा इवान टाईमलॅप्स व्हिडीओ बनवत होता. याचवेळी त्याला अरोरा ऑस्ट्रेलिस (पाच अज्ञात लाईट) दिसायला लागली.
या पाचही लाईट एकमेकांसोबत चालल्या होत्या. पहिल्यांदा दोन, नंतर तीन नंतर चार असे करत पाचही लाईट दिसू लागल्या आणि अचानक गायब झाल्या.
यानंतर काही वेळाने पुन्हा ही लाईट वेगवेगळ्या ठिकाणी दासू लागली. दोन याने वेगवेगळ्या ठिकाणी दिसत होती.
या घटनेचा व्हिडीओ इवानने रशियन वैज्ञानिकांकडे तपासणीसाठी पाठविला आहे.
इवान यांनी या घटनेचा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. सदर्न लाईटशिवाय मी काही वेगळेही पाहिले. या टाईम लॅप्समध्ये काहीतरी वेगळी वस्तू दिसत आहे.
रशियाची अंतराळसंस्था रॉसकॉसमसचे प्रवक्ते व्लादिमीर यूस्तीमेंको यांनी हा व्हिडीओ अद्भूत असल्याचे म्हटले आहे. या व्हिडीओची तपासणी केली जात आहे.
या पाचही लाईट 9 ते 12 सेकंद सोबत होत्या. त्यानंतर त्या वेगवेगळ्या झाल्या.
टाईमलॅप्सचा व्हिडीओ जर सामान्य व्हिडीओमध्ये कन्व्हर्ट केला तर पाचही लाईट या जवळपास 52 सेकंद एकत्र होत्या, ज्या नंतर बेपत्ता झाल्या.
या व्हिडीओमध्ये UFO सारख्या दिसणाऱ्या गूढ लाईट पाहता येतात.