'या' देशांमध्ये हिजाब घालण्यास आहे सक्त मनाई, नियमांचे उल्लंघन केल्यास होईल दंडात्मक कारवाई!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 05:31 PM2022-02-09T17:31:34+5:302022-02-09T17:47:40+5:30

Hijab Controversy: हिजाब घालण्यावरून भारतात सध्या गदारोळ सुरू आहे. यावरून राजकारण तापले आहे.

हिजाब घालण्यावरून भारतात सध्या गदारोळ सुरू आहे. यावरून राजकारण तापले असतानाच दुसरीकडे हिजाबबाबत अनेक राज्यांत निदर्शने सुरू झाली आहेत. यादरम्यान, जगातील इतर देशांमध्ये हिजाबबाबत काय नियम आहेत? ते जाणून घ्या...

नेदरलँडमध्ये शाळा, रुग्णालये, सार्वजनिक वाहतूक आणि सरकारी भवनांमध्ये हिजाब किंवा चेहरा झाकण्यास बंदी आहे. त्यामुळे बंदी असतानाही कोणी आढळले तर दंड भरावा लागू शकतो.

युरोपमध्ये फ्रान्सने सर्वात आधी 2004 मध्ये शाळांमध्ये हिजाबवर बंदी घातली. यानंतर फ्रान्स सरकारने 2011 मध्ये सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यावरही बंदी घातली होती. हिजाब परिधान करणाऱ्यांचे येथे स्वागत नाही, असे फ्रान्सच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्षांनी म्हटले होते.

डेन्मार्कमध्ये हिजाब घालण्यास सक्त मनाई आहे. हिजाब घालणे किंवा चेहरा झाकणे याबाबत कडक कायदा आहे. पकडले गेल्यास 12 हजार ते 85 हजार रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो.

दहशतवादी कारवाया पाहून बल्गेरियन सरकारने निर्णय घेतला होता की देशात हिजाब घालणे किंवा चेहरा झाकणे बेकायदेशीर आहे. बल्गेरियामध्ये सरकारने चेहरा झाकण्याबाबत कडक कायदे लागू केले आहेत.

बेल्जियममध्ये हिजाब घालण्याबाबत अनेक निर्बंध आहेत. येथे शाळा, रुग्णालये, सार्वजनिक वाहतूक आणि सरकारी इमारतींमध्ये हिजाब किंवा चेहरा झाकण्यावर बंदी आहे.