weird animals in the world
‘हे’ आहेत जगातील सर्वात विचित्र प्राणी By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2018 12:44 PM2018-04-25T12:44:10+5:302018-04-25T12:44:10+5:30Join usJoin usNext आपण सर्वांनीच कधीना कधी मुक्या प्राण्यांना जवळ घेऊन त्यांच्याशी मैत्री केली आहे. पण जगात असेही काही प्राणी आहेत जे भयानक असून दिसायलाही विचित्र आहेत. तसंच यावरून पृथ्वीवर असलेल्या विविध जैवविविधतेचाही अंदाज आपल्याला येतो. १) बिअर डॉग – आग्नेय आशियात आढळणाऱ्या या प्राण्याला त्याच्या कुत्र्यासारख्या दिसणाऱ्या चेहऱ्यामुळे व सर्वात लांब जीभेमुळे बिअर डॉग हे नाव पडलं. २) अंगोरा ससा – तुर्कीमधील सर्वात प्रसिद्ध पाळीव प्राणी म्हणून या सशाचा उल्लेख होतो. या सशांच्या अंगावरील केसांमुळे याला सर्वात जास्त मागणी आहे. ३) टार्सियर – जगातील सर्वात विचित्र आणि अद्भूत डोळे असणारा प्राणी म्हणून टार्सियर प्रसिद्द आहे. तसंच अंधारात उडणाऱ्या पक्षांना पकडणं त्याला सहज जमतं. ४) कोमोंडोर – श्वानांच्या प्रजातीतील सर्वात मोठा श्वान म्हणून कोमोंडर प्रसिद्ध आहे. कोमोंडरला वेणी घातल्याप्रमाणे अंगावर केस असतात. ५) स्पिंक्स मांजर – स्पिंक्स मांजरींना अंगावर केस नसतात. तसंच माणसाप्रमाणे जास्त वेळ उन्हात राहिल्याने त्यांना त्वचेचे विकार होतात. टॅग्स :आंतरराष्ट्रीयप्रवासInternationalTravel