जगभरात असं झालं नववर्षाचं स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 12:58 IST2019-01-01T12:13:48+5:302019-01-01T12:58:28+5:30

नववर्ष 2019 चे आज जगभरात उत्साहात स्वागत करण्यात आले. नववर्षाच्या स्वागतासाठी जगातील विविध भागात आकर्षक रोषणाई आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
दुबई - दुबईमध्ये गगनचुंबी इमारतींवर रोषणाई आणि फटाक्यांची आतषबाजी करून नववर्षाचं स्वागत करण्यात आले.
दुबई - जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफा येथील नववर्षाचे स्वागत
दुबई - नववर्षाच्या स्वागतासाठी जमलेले पर्यटक
फ्रान्स - फ्रान्समध्येही नववर्षाचे स्वागत उत्साहात करण्यात आले.
फ्रान्स - पॅरिस येथे करण्यात आलेली आकर्षक रोषणाई
फ्रान्स - नववर्षाच्या स्वागतासाठी जमलेला जनसमुदाय
हाँगकाँग - हाँगकाँगमध्ये फटाक्यांची आकर्षक आतषबाजी करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले.
लंडन (इंग्लंड) - नववर्षाच्या स्वागतासाठी लंडन फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये असे उजळून निघाले होते.
लंडन (इंग्लंड) - नववर्षाच्या स्वागतासाठी जमलेली मंडळी फटाक्यांच्या आतषबाजीचे क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपून घेत होती.
लंडन (इंग्लंड) - आतषबाजीमुळे परिसर असा उजळून निघाला होता.
लंडन (इंग्लंड) - आकर्षक आतषबाजीचे एक छायाचित्र.
न्यूझीलंड - जगात सर्वप्रथम न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे आगमन होते. तेथे फटाक्यांची आतषबाजी करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले.
न्यूझीलंड - न्यूझीलंडमध्ये होत असलेले नववर्षाचे स्वागत.
उत्तर कोरिया - उत्तर कोरियामध्येही नववर्षाचे उत्साहात स्वागत झाले.
उत्तर कोरिया - फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये उजळून निघालेला परिसर
सिडनी (ऑस्ट्रेलिया) - नववर्षाच्या स्वागतासाठी करण्यात आलेल्या आतषबाजीने ऑस्ट्रेलियातील सिडनी शहर असे उजळले होते.