What is the hourly income of worlds reachest family? 28 crores ... be surprised to read
'या' कुटुंबाचे तासाचे उत्पन्न तब्बल 28 कोटी...अंबानी पहिल्या दहामध्ये By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 08:01 PM2019-08-17T20:01:29+5:302019-08-17T20:04:04+5:30Join usJoin usNext जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अॅमेझॉनचे मालक जेफ बेजोस आहेत. मात्र, तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब कोण हे माहिती आहे का...नाही ना...वाचून धक्का बसेल पण या कुटुंबाचे तासाचे उत्पन्न 28 कोटी आहे. या यादीमध्ये अंबानींचे कुटुंबही सहभागी आहे. खरेतर ब्लूमबर्गने जगातील 25 सर्वात जास्त श्रीमंत कुटुंबाची यादी प्रसिद्ध केली आहे. ज्याच्याकडे जवळपास दीड लाख कोटी रुपये आहेत. जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबाच्या यादीत सर्वात पहिला क्रमांक सुपरमार्केट वॉलमार्टच्या मालकाचा आहे. यानुसार वॉलमार्ट कुटुंबीय दर मिनिटाला 50 लाख रुपये तर दर तासाला 28 कोटी 46 लाख रुपये एवढे प्रचंड कमवितात. म्हणजेच दर दिवसाला ते 7 अब्ज 12 कोटी एवढा पैसा कमवितात. वॉलमार्ट नंतर दुसरा क्रमांक मार्स कुटुंबाचा आहे. त्यांची कंपनी मार्स बार्स चॉकलेट बनविते. या यादीमध्य़े फेरारी, बीएमडब्ल्यू आणि हयात हॉटेल समूहाचेही नाव आहे. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा परिवारही या यादीमध्ये नवव्या स्थानावर आहे, अंबानींच्या कुटुंबाचे एकूण उत्पन्न 5040 कोटी रुपये आहे. टॅग्स :मुकेश अंबानीअॅमेझॉनMukesh Ambaniamazon