तुमच्या मेंदूत चाललंय काय? हे हेल्मेट रेकॉर्ड करणार, अंतराळवीरांच्या मेंदूतून डेटा गोळा करणार By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 04:09 PM 2022-03-31T16:09:34+5:30 2022-03-31T16:14:05+5:30
Science News: इस्राइलमधील एका कंपनीने खास पद्धतीचं हेल्मेट विकसित केलं असून, ते अंतराळात पाठवण्यात येणार आहे. हे हेल्मेट अंतराळवीरांच्या मेंदूतून डेटा गोळा करेल. हे हेल्मेट एवढं खास का आहे, त्याची माहिती पुढीलप्रमाणे. इस्राइलमधील एका कंपनीने खास पद्धतीचं हेल्मेट विकसित केलं असून, ते अंतराळात पाठवण्यात येणार आहे. हे हेल्मेट अंतराळवीरांच्या मेंदूतून डेटा गोळा करेल. हे हेल्मेट एवढं खास का आहे, त्याची माहिती पुढीलप्रमाणे
हे हेल्मेट मेंदूवर लक्ष ठेवणारं खास पद्धतीचं हेल्मेट आहे ते अंतराळामध्ये काम करण्यासाठी तयार करण्यात आलं आहे.
हे हेल्मेट ३ एप्रिल रोजी अंतराळाच्या प्रवासावर जाणार आहे. तिथे दहा दिवसांपर्यंत त्याचा वापर केला जाईल.
हे हेल्मेट इस्त्राइलमधील कंपनी ब्रेन डॉट स्पेसने तयार केले आहे. यामध्ये खास पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. तो अंतराळवीरांच्या मेंदूमधील हालचालींची नोंदणी करणार आहे.
ब्रेन डॉट स्पेसचे सीईओ आणि सहसंस्थापक याइर लेवी यांनी रॉयटर्सला सांगितले की, आमचा हेतू मानवी मेंदूच्या अंतरंगांमध्ये पोहोचण्याचा आहे. आम्ही मेंदूची भाषा तयार करू इच्छितो. त्यामाध्यमातून डॉक्टर, संशोधक आणि अॅप डेव्हलपर्स चांगले उत्पादन आणि सेवा देऊ शकतील.
या हेल्मेटमध्ये ईसीजीची सुविधा आहे तसेच कवटीच्या संपर्कात राहणारे ४६० ब्रश आहेत. तेच ब्रश मेंदूमधून डेटा गोळा करतील.
या हेल्मेटचा प्रयोग आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये होणार आहे. हा प्रयोग स्पेस एक्सच्या फ्लाईटचा भाग आहे. ते ३ एप्रिल रोजी १० दिवसांच्या मोहिमेवर रवाना होण्याची शक्यता आहे.