When the muddy 'lake' became swimming and selfie spot in Indonesia
गाळयुक्त 'तळं' स्विमींग अन् सेल्फी स्पॉट बनतं तेव्हा.... By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 05:01 PM2019-09-21T17:01:24+5:302019-09-21T17:05:09+5:30Join usJoin usNext इंडोनेशियातील एका खेड्याचा चेहरामोहराच स्थानिक नागरिकांनी बदललाय. गावातील तळ्याचं नवं रुप या गावकऱ्यांनी उभारलंय. 15 वर्षांपूर्वी गढुळ पाणी आणि गाळ, गरिबी, बेरोजगारीने त्रस्त असलेल्या इंडोनेशियातील अंबेल पोंगोक गाव आता एक पर्यटन स्थळ बनलं आहे. या गावातील प्रत्येक कुटुंब अंडर वॉटर सेल्फी स्पॉटच्या माध्यमातून महिन्याला 2500 रुपये कमावतोय. या गावातील तलावाचे खास इंस्टाग्राम अकाऊंट असून त्याला 40 हजार फॉलोवर्स आहेत. कधीकाळी गरीब गाव म्हणून ओळख असलेलं अंबेल पोंगोक हे गाव आज इंडोनेशियातील टॉप 10 समृद्ध गावांच्या यादीत आहे. केवळ 4 लाख रुपये वार्षिक उत्पन्न कमावणारं हे गाव आता वर्षाला 7 कोटी रुपये कमावतंय.टॅग्स :पाणीWater