सुनीता विल्यम्स पृथ्वीवर कधी परतणार? बोईंग स्टारलाइनरमध्ये तांत्रिक बिघाड By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 12:46 PM 2024-07-26T12:46:49+5:30 2024-07-26T12:53:12+5:30
गेल्या काही दिवसापासून सुनीता विल्यम्स अंतराळात अडकल्या आहेत. त्यांच्या परतीच्या प्रवासात तांत्रिक बिघाड आला आहे. सुनीता विल्यम्स सध्या नासाच्या मोहिमेवर आहे. बोईंग स्टारलाइनरला असणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे त्या सध्या दुसऱ्या साथीदारासह अवकाशात अडकल्या आहेत.
बुच विल्मोर त्यांच्यासोबत अंतराळ यानात आहेत. बुच विल्मोर हे एक सेवानिवृत्त यूएस नेव्ही कॅप्टन आहेत त्यांनी १९९० च्या दशकात पहिल्या यूएस गल्फ युद्धादरम्यान २१ लढाऊ मोहिमांसह विमानवाहू जहाजांच्या डेकवरून लढाऊ विमाने उडवणारी चार ऑपरेशन पूर्ण केली.
त्यांनी नौदलाचा चाचणी पायलट आणि फ्लाइट इन्स्ट्रक्टर म्हणूनही काम केले आहे. विल्मोर २००० मध्ये नासाच्या अंतराळवीर कॉर्पमध्ये सामील झाले होते.
२००९ मध्ये नासाच्या अंतराळयानाचा पायलट म्हणून त्यांनी पहिल्यांदा स्पेस स्टेशनवर उड्डाण केले. २०१४ मध्ये, ते दोन अंतराळवीरांसह रशियन सोयुझ अंतराळ यानातून फिरत असलेल्या प्रयोगशाळेत परतले.
जूनमध्ये रॉयटर्सच्या अहवालानुसार, बुच विल्मोर यांनी आतापर्यंत १७८ दिवस अंतराळात घालवले आहेत आणि चार स्पेसवॉक केले आहेत. त्यांच्याकडे इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग आणि एव्हिएशन सिस्टीम्समध्येही पदव्या आहेत.
सुनीता विल्यम्स एका अंतराळयानातून पृथ्वीपासून ३६० किलोमीटर दूर गेल्या आहेत. त्या ४५ दिवसांच्या अंतराळ मोहिमेवर होत्या पण अजून परतलेल्या नाहीत.
त्यांच्याबाबत काही दिवसापूर्वी अपडेट देण्यात आली होती, यात त्या पाण्याशिवाय अंतराळात रोपे वाढवण्याच्या तंत्रज्ञानावर काम करत असल्याचे सांगण्यात आले होते.
ताज्या अपडेटमध्ये, अधिकाऱ्यांनी सांगितले की, परत येण्यास एक महिन्यापेक्षा जास्त उशीर झाला आहे आणि जोपर्यंत अभियंते त्यांच्या बोईंग कॅप्सूलमध्ये असलेला बिघाड सोडवू शकत नाहीत तोपर्यंत दोन नासाचे अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहतील.