CoronaVirus: कोरोनाचं नवं केंद्र निश्चित?; कोट्यवधींची धाकधूक वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 03:32 PM2020-03-26T15:32:27+5:302020-03-26T15:46:34+5:30

चीनच्या हुवानमधून कोरोना जगभरात पसरला. सध्या कोरोनामुळे जगात खळबळ माजलीय.

कोरोनानं सर्वात आधी चीनमधून थैमान घातलं. चीनमध्ये कोरोनानं ३ हजारहून अधिक जणांचा बळी घेतला.

चीननंतर कोरानानं युरोपात थैमान घातलं. इटली, स्पेन, फ्रान्समध्ये कोरोनानं १२ हजारपेक्षा जास्त जणांचा बळी गेला.

चीनपेक्षा इटलीला कोरोनाचा जास्त फटका बसलाय. कोरोनामुळे इटलीत साडे सात हजारपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालाय.

इटलीची आरोग्य यंत्रणा जगातील सर्वात्तम पाचांमध्ये गणली जाते. मात्र कोरोना संकटापुढे तीदेखील मोडकळीस आलीय.

चीन पाठोपाठ युरोपाला तडाखा दिल्यानंतर आता कोरोना अमेरिकेत थैमान घालतोय. अमेरिकेत कोरोनामुळे १ हजारपेक्षा जास्त जण मृत्युमुखी पडले आहेत.

युरोपनंतर आता अमेरिका कोरोनाचं पुढचं केंद्र असू शकतं, असा धोक्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिलाय.

अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्या वेगानं वाढत असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्या मार्गारेट हॅरिस यांनी दिली.

गेल्या २४ तासांमध्ये जगभरात आढळून आलेल्या कोरोनाग्रस्तांपैकी ८५ टक्के रुग्ण युरोप आणि अमेरिकेतले आहेत. यातले ४० टक्के रुग्ण अमेरिकेन आहेत.

अमेरिका कोरोनाचं पुढील केंद्रस्थान ठरू शकतो. मात्र अमेरिकन आरोग्य यंत्रणा ही परिस्थिती टाळू शकतात. त्यांच्याकडून परिस्थिती कशी हाताळली जाते, यावर सर्वकाही अवलंबून असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय.

अमेरिकेत कोरोनाचे ६८ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. चीन आणि इटलीनंतर कोरोनाचे सर्वाधिक रुग्म अमेरिकेत आहेत.