टेलिग्रामच्या CEO ला तुरुंगात पाठवणारी २४ वर्षीय 'मिस्ट्री वुमन' कोण आहे? दुबईत संपर्कात कशी आली?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 07:16 PM2024-08-27T19:16:29+5:302024-08-27T19:26:19+5:30

Telegram CEO's Arrest: रशियन अब्जाधीश आणि टेलिग्रामचे सीईओ पावेल दुरोव यांना पॅरिसमध्ये अटक करण्यात आली आहे. आता त्यांच्या अटकेची तार एका मुलीशीही जोडली जात आहे, जी सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहे.

टेलिग्रामचे सीईओ पावेल दुरोव यांना पॅरिसमध्ये अटक करण्यात आली. पॉवेलवर त्याच्या कंपनी टेलिग्रामच्या माध्यमातून गुन्हेगारी मजकूर पसरवल्याचा आरोप आहे. याशिवाय त्याच्यावर अनेक आरोप आहेत.

रशियाचा 'मार्क झुकेरबर्ग' म्हणून ओळखला जाणारा पावेल दुरोव अनेक पाश्चिमात्य देशांच्या नजरेत बराच काळ होता. पॅरिसमधील बार्गेट विमानतळावर तो त्याच्या खासगी जेटमधून उतरताच अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली.

पावेलसोबत ज्युली वाव्हिलोवा नावाची महिला देखील होती. तिलाही फ्रेंच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र आता पावेलच्या अटकेमागे ज्युलीचेही नाव पुढे येत आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या या रहस्यमय महिलेबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत.

ज्युली वाव्हिलोवाच्या इंस्टाग्राम प्रोफाइलनुसार ती २४ वर्षांची असून ती दुबईस्थित क्रिप्टो कोच आहे. ज्युलीने तिच्या इन्स्टा बायोमध्ये तिला गेमिंग, क्रिप्टो करन्सी आणि विविध भाषांमध्ये रस असल्याचे म्हटलं आहे.

ज्युलीच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवरून असे दिसते की तिचे आणि टेलिग्रामचे संस्थापक पावेल दुरोव यांच्यात जवळचे नाते आहे. ज्युलीच्या प्रोफाईलवर दोघांचे अनेक फोटो आहेत. ज्यामध्ये ते कझाकिस्तान, किर्गिस्तानपासून अझरबैजानपर्यंत एकत्र दिसत आहेत. मात्र ते रिलेशनशिपमध्ये आहेत की नाही हे स्पष्ट झाले नाही.

पावेल दुरोवच्या अटकेबाबत अनेक दावे समोर येत आहेत. एक दावा आहे की ज्युलीने पावेल ला हनीट्रॅप केले आणि फ्रान्सला नेले. जिथे त्याला अटक करण्यात आली. ज्युली एका गुप्तचर एजंटप्रमाणे काम करत असल्याचा दावा केला जात आहे.

पावेलसोबत ती जिथे गेली होती त्या सर्व ठिकाणांचे फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. एक प्रकारे ती अधिकाऱ्यांना आपण कुठे आहोत हे सांगत ​​होती. असाही दावा आहे की ज्युली वाव्हिलोव्हा स्वतः पोलिसांच्या निशाण्यावर होती आणि तिच्यासोबत पावेल अडकला.

जुली वाव्हिलोवा ही इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादची एजंट असू शकते, असा दावाही करण्यात आला आहे. ती पश्चिमेकडील एका सिंडिकेटचा भाग होती ज्याचा उद्देश पावेल पकडणे हा होता.

ज्युलीवर संशय येण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे तिची पार्श्वभूमी कोणालाच फारशी माहिती नाही. पावेल रशिया सोडून दुबईला शिफ्ट झाला तेव्हा ज्युली अचानक ज्युली त्याच्या संपर्कात कशी आली आणि मग एवढी जवळ कशी आली यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.