पंजाब पोलिसांनी अटक केलेली 'ब्युटी क्वीन'; कोन आहे खदीजा शाह? By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 10:52 AM 2023-05-24T10:52:40+5:30 2023-05-24T16:41:32+5:30
पाकिस्तानची चर्चेत असलेली फॅशन डिझायनर खदीजा शाह गेल्या काही दिवसांपासून अधिकच चर्चेत आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील पोलिसांनी खदीजा शाहला अटक केली आहे. पाकिस्तानची चर्चेत असलेली फॅशन डिझायनर खदीजा शाह गेल्या काही दिवसांपासून अधिकच चर्चेत आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील पोलिसांनी खदीजा शाहला अटक केली आहे.
९ मे रोजी झालेल्या हिंसाचारात लाहौर येथील कॉर्प्स कमांडर हाऊस (जिन्ना हाऊस) वरील हल्ल्याचा मुख्य आरोपी मानलं जात आहे.
जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, खदीजाने स्वत:हून पोलिसांकडे आत्मसमर्पण करणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र, पोलिसांनी तिला अटक केली. तिच्यासह तिचे पती आणि कुटुंबातील सदस्यांनाही अटक करण्यात आलीय.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना ९ मे रोजी अटक करण्यात आली होती. अल कादिर ट्रस्ट केसमध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर, पीटीआय समर्थकांनी संपूर्ण देशभर विरोध प्रदर्शन केला होता.
पीटीआय समर्थकांच्या आंदोलनात देशातील अनेक भागांत हिंसाचार झाला. काही जणांनी लाहौरमधील जिन्ना हाऊस आणि इतर सैन्य कार्यालयांनाही लक्ष्य केलं होतं. पाकिस्तान आर्मीने खदीजा शाहला जिन्ना हाऊसवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याचे सांगत अटक केली आहे.
या हिंसाचारानंतर पंबाज प्रांताचे अंतरिम मुख्यमंत्री मोहसिन नक्वी यांनी म्हटले की, ९ मे रोजी सैन्य कार्यालय संस्थांवर झालेल्या हल्ल्यातील महिलांना अटक करण्यात येईल. त्यानंतर, काही दिवसांतच खदीजा शाहची एक ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती.
या व्हिडिओत शाहने म्हटले होते की, गेल्या काही दिवसांपासून माझ्या कुटुंबीयांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मी पीटीआय समर्थक असून लाहौरच्या जिन्ना हाऊसबाहेरील विरोध प्रदर्शनात सहभागी असल्याचेही तिने म्हटले होते.
मी आंदोलनात सहभागी होते, पण लोकांना भडकवण्याचा किंवा हिंसाचाराचे समर्थन होईल, असे कुठलेही कृत्य आपण केले नसल्याचे खदीजाने म्हटले आहे.
खदीजा शाह एक फॅशन डिझायनर असून इम्रान खानच्या पीटीआय पक्षाची समर्थक आहे. खदीजा सलमान शाह यांची कन्या असून पाकिस्तानचे माजी सेनाप्रमुखांची नातही आहे.
सलमान शाह हे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य होते. तर, त्यांनी उस्मान बुजदार सरकारसाठी पंजाब सरकारमध्ये सल्लागार म्हणून काम केलं होतं.