Who is TJP? who is targeting Pakistan Army; Tehreek-e-Jihad Pakistan terrorist attack
कोण आहे TJP? जो पाकिस्तानी लष्कराला करतोय टार्गेट; दहशतवादी हल्ल्यात त्याचाच हात By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 12:40 PM2023-12-13T12:40:44+5:302023-12-13T12:45:58+5:30Join usJoin usNext पाकिस्तानातील संवेदनशील भाग खैबर पख्तूनख्वामध्ये मंगळवारी हल्ला झाला.पाकिस्तानी तालिबानी संबंधित दहशतवाद्यांनी हा हल्ला घडवला. ज्यात कमीत कमी २३ सैनिक मारले गेले १२ डिसेंबरला सकाळी डेरा इस्माइल खान यांच्या दरबान परिसरात ६ दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांच्या चौकीला लक्ष्य केले. ज्यात सैनिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्याला प्रत्युत्तर देत सुरक्षा जवानांनी ६ हल्लेखोरांना ठार केले. या हल्ल्याची जबाबदारी तहरीक ए जिहाद पाकिस्तान(टीजेपी)नं घेतली आहे. ही दहशतवादी संघटना आहे. या हल्ल्यासाठी आत्मघातकी हल्लेखोरांना पाठवले होते असं टीजेपीचे प्रवक्ते मुल्ला कासिम यांनी सांगितले. पाकिस्तानातील मोठ्या हल्ल्यांमागे याच दहशतवादी संघटनेचा हात असतो. ४ नोव्हेंबरला टीजेपी दहशतवाद्यांनी लाहौरहून जवळपास ३०० किमी अंतरावर असलेल्या पाकिस्तानी वायू दलाच्या प्रशिक्षण केंद्रावर हल्ला केला होता. ज्यात ३ विमानांचे नुकसान झाले होते. पाकिस्तानात झालेल्या तीन वेगवेगळ्या दहशतवादी हल्ल्यात १७ सैनिकांचा मृत्यू झाल्यानंतर प्रत्युत्तरात सुरक्षा जवानांनी बऱ्याच दहशतवाद्यांना कंठस्नानी घातले. यावर्षी जुलैमध्ये टीजेपी दहशतवाद्यांनी बलूचिस्तानच्या झोब गैरीसनवर हल्ला केला होता. ज्यात ४ सैन्य मारले गेले तर ५ जखमी झाले होते. तहरीक ए जिहाद पाकिस्तान ही नवीन दहशतवादी संघटना आहे. ज्याची स्थापना यावर्षीच्या सुरुवातीला झाली. ही संघटना प्रामुख्याने बलूचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा प्रांतात सक्रीय आहे. या दहशतवादी संघटनेचा मूळ हेतू इस्लामिक राज्य स्थापित करणे आणि तालिबानद्वारे अफगाणिस्तानात लागू केलेला शरिया कायदा इथे अंमलात आणून धर्माचा प्रसार करणे आहे. त्यामुळे या संघटनेने पाकिस्तानविरोधात जिहाद उघडला आहे. टीजेपी या संघटनेचे मूळ तहरीक ए तालिबान पाकिस्तानशी आहे. या संघटनेचे नेतृत्व मौलाना अब्दुल याघिस्तानी करतो. याघिस्तानीने कराचीतील एका प्रमुख देवबंदी मदरसा जामिया फारुकियात शिक्षण घेतले. त्याने २०२१ मध्ये अफगाणिस्तानात नोटा आणि अमेरिकन सैन्याशी लढाई केली. टीजेपीने त्यांच्या विचारधारेत शेख उल हिंदकडून प्रेरणा घेतल्याचा हवाला दिला. शेख उल हिंद भारतीय इस्लामी तज्ज्ञ महमूद हसन देवबंदीसाठी वापरण्यात आले होते. पाकिस्तानच्या स्वातंत्र्यानंतर शेख उल हिंदचे आंदोलन संपु्ष्टात आले. आता पाकिस्तानात इस्मालिक व्यवस्था लागू करण्यासाठी सशस्त्र जिहार गरजेचा आहे असं टीजेपी प्रवक्त्यांनी सांगितले.टॅग्स :पाकिस्तानदहशतवादी हल्लाPakistanTerror Attack