Who Is 'Yevgeny Prigozhin' Directly Threatening Russia Vladimir Putin?
पुतिन यांना थेट धमकी देणारा 'येवगेनी प्रिगोझिन' आहे कोण?; पहिला विकायचा हॉट डॉग By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 10:07 AM2023-06-24T10:07:14+5:302023-06-24T10:16:45+5:30Join usJoin usNext रशियामध्ये वॅगनर ग्रुपने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधात सत्तापालट करण्याची घोषणा केली आहे. वॅनगर ग्रुपचे लढाऊ सैनिक मोठ्या संख्येने मॉस्कोच्या दिशेने जात आहेत. त्यांना रोखण्यासाठी रशियन सैन्याने मार्गावर जोरदार बॅरिकेडही लावले आहेत. रशियन सैन्य आणि वॅनगर ग्रुप यांच्यात रशियन शहरात रोस्तोव्हमध्ये भीषण लढत झाल्याचं समोर आले आहे. वॅनगर ग्रुपला एकेकाळी पुतिनची प्रायव्हेट आर्मी म्हटलं जायचं. या आर्मीच्या सैनिकांनी रशियन सैन्यासोबत युक्रेनमध्ये युद्धही केले आहे. पण, या काळात वॅनगर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांनीही रशियन सैन्यावर अनेकदा टीका केली आहे. प्रिगोझिन यांनी पहिल्यांदाच पुतिन यांना नामोहरम करण्याची थेट धमकी दिली आहे. वॅगनर ग्रुपच्या सैनिकांनी मॉस्कोकडे कूच केल्यानंतर क्रेमलिन आणि ड्यूमा, रशियन संसदेतील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.पुतिन यांना आव्हान देणारे रशियात कोणी नाही असं मानलं जायचं. अशा परिस्थितीत, येवगेनी प्रिगोझिनची धमकी खूप गांभीर्याने घेतली जात आहे. येवगेनी प्रिगोझिन यांनी बाखमुत येथील वॅगनर प्रशिक्षण शिबिरावर क्षेपणास्त्र हल्ल्यासाठी क्रेमलिनला जबाबदार धरले आहे. या हल्ल्यासाठी रशियाला शिक्षा देण्याचं वचनही त्यांनी घेतलं आहे. या हल्ल्यामुळे वॅगनर ग्रुपचे मोठे नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे. प्रिगोझिनने जाहीर केले की, आम्ही मॉस्कोला जात आहोत, जो कोणी मार्गात येईल, तो स्वत: त्याला जबाबदार असेल. ज्यांनी आज आपल्या लोकांचा नाश केला, ज्यांनी दहा हजार, हजारो रशियन सैनिकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले, त्यांना शिक्षा होईल, असे त्यांनी व्हिडिओ संदेशात म्हटले आहे. जो कोणी प्रतिकार करण्याचा प्रयत्न करेल, आम्ही त्यांना आमचा शत्रू मानू आणि आमच्या मार्गात उभ्या असलेल्या सर्व चौक्यांसह त्यांचा तात्काळ नष्ट करू असंही वॅगनर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांनी इशारा दिला आहे. येवगेनी प्रिगोझिन यांचा जन्म लेनिनग्राडमध्ये पुतिननंतर सुमारे नऊ वर्षांनी १९६१ मध्ये झाला होता. हे शहर आता सेंट पीटर्सबर्ग म्हणून ओळखले जाते. तो लहान असतानाच त्याचे वडील वारले. प्रिगोझिनची आई रुग्णालयात काम करते. प्राथमिक शिक्षणानंतर प्रिगोझिन क्रीडा अकादमीत सामील झाले. यादरम्यान तो दररोज तासन्तास क्रॉस-कंट्री स्कीइंग करत असे. असे असूनही एक व्यावसायिक खेळाडू म्हणून त्यांना यश मिळू शकले नाही. शाळा पूर्ण केल्यानंतर, येवगेनी प्रिगोझिन किरकोळ गुन्हेगारांच्या टोळीत सहभागी झाला. १९८० च्या एका संध्याकाळी, सोव्हिएत युनियनमध्ये लिओनिड ब्रेझनेव्हच्या राजवटीत, १८ वर्षीय प्रिगोझिनने मध्यरात्री सेंट पीटर्सबर्ग कॅफेतून बाहेर पडला आणि एका महिलेला एका काळोख्या रस्त्यावरून एकटी चालताना पाहिले. प्रिगोझिनच्या मित्राने सिगारेट मागून महिलेचे लक्ष विचलित केले. ती तिची पर्स उघडण्यासाठी गेली असता प्रिगोझिन तिच्या मागून आला आणि त्याने तिचा गळा पकडला. ती बेशुद्ध होईपर्यंत तो तिच्या मानेवर दाबत राहिला. मग, त्याच्या मित्राने तिचे बूट काढले, तर प्रिगोझिनने तिचे सोन्याचे कानातले काढून खिशात टाकले. महिलेला रस्त्यावर पाडून सर्वांनी तेथून पळ काढला. यानंतर, १९८१ मध्ये रशियन न्यायालयाने प्रिगोझिनला अशा अनेक चोरी आणि दरोड्यांसाठी १३ वर्षांची शिक्षा सुनावली. यानंतर प्रिगोझिनला जवळपास एक दशक तुरुंगात शिक्षा भोगावी लागली. त्यानंतर प्रिगोझिनने हॉटडॉग्स विकून व्यवसायाला सुरुवात केली. त्याने आपल्या आयुष्यात दिलेल्या एकमेव मुलाखतीत सांगितले की आम्ही महिन्याला 1,000 डॉलर कमावले, ज्याची किंमत रुबल नोट्समध्ये खूप आहे. माझ्या आईला सगळ्या नोटा मोजता येत नव्हत्या. १९९५ मध्ये प्रिगोझिनने रेस्टॉरंट उघडण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने ब्रिटिश हॉटेल चेनचे मालक टोनी ग्रीर यांची भेट घेतली. प्रिगोझिनने प्रथम वाईन शॉप उघडले, नंतर त्याचे नवीन रेस्टॉरंट, ओल्ड कस्टम हाऊस, सुरुवातीला ओल्ड कस्टम हाऊसने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्ट्रिपर्सची नियुक्ती केली. पण त्याच्या रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांचं कौतुक व्हायला लागताच त्याने स्टिपर्सला नोकरीवरून काढले. या रेस्टॉरंटमध्ये रशियाचे सर्वोच्च उद्योगपती, नोकरशहा, सेंट पीटर्सबर्गचे महापौर अनातोली सोबचक आणि त्या वेळी त्यांचे उपमहापौर व्लादिमीर पुतिन हे वारंवार येत होते. यादरम्यान पुतिन आणि प्रीगोझिन यांच्यातील मैत्री वाढत गेली. पुतिन यांनी रशियातील सरकारी कार्यक्रमांसाठी दिलेले कंत्राट प्रीगोझिन यांना दिले. यानंतर, २०१२ मध्ये, मॉस्कोमधील शाळांना अन्न पुरवण्यासाठी १०.५ अब्ज रूबल किमतीचा करार देखील केला. रशियाने २०१४ मध्ये क्रिमियावर कब्जा केला तेव्हा प्रिगोझिनने वॅगनर ग्रुपला सत्तेत आणले. यादरम्यान, रशियन आणि युक्रेनियन सैन्यांमधील युद्धात वॅनगर ग्रुपचे सैनिकही सहभागी झाले होते. प्रिगोझिन याने पुतीन यांना प्रायव्हेट आर्मी कंपन्या स्थापन करण्याचा सल्ला दिला. तथापि, बर्याच तज्ञांना वाटतं की, वॅनगर ग्रुपची सुरुवात रशियन गुप्तचर संस्था जीआरयूची लष्करी गुप्तचर युनिट म्हणून झाली. रशियन संरक्षण मंत्रालयाच्या एका माजी अधिकार्याने सांगितले की काहींचा तो GRU चा भाग आहे असे वाटले असेल, परंतु शेवटी तो प्रिगोझिनचा प्रकल्प होता. रशियन संरक्षण मंत्रालयाने प्रिगोझिनला दक्षिण रशियातील मोल्किनो येथे जमीन दिली, जिथे प्रिगोझिनशी संबंधित कंपन्यांनी मुलांच्या छावणीच्या नावाखाली मिलिशियासाठी बेस कॅम्प उभारला. प्रिगोझिनच्या झपाट्याने वाढीमुळे रशियन संरक्षण मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांना त्रास होऊ लागला. त्याचा प्रचार जसजसा वाढत गेला तसतसा तणाव वाढत गेला. २०१५ च्या उत्तरार्धात प्रिगोझिनसाठी एक निर्णायक क्षण आला जेव्हा पुतीन यांनी बशर अल-असाद यांच्या राजवटीला चालना देण्यासाठी सीरियामध्ये लष्करी हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला. प्रिगोझिनने अन्न आणि पुरवठ्यासाठी करार घेतले आणि तेथे त्याचे वॅगनर सैन्य पाठवले. सीरियामध्ये, वॅगनरने प्रथम स्वत: ला एक शक्तिशाली लढाऊ सैन्य म्हणून स्थापित केले. या सैन्यात सीरियातील अनेक युद्ध गुन्हेगारांचाही समावेश असल्याचा आरोप होता. याशिवाय वॅगनर ग्रुपचाही सीरियातील युद्ध गुन्ह्यांमध्ये सहभाग होता.टॅग्स :व्लादिमीर पुतिनरशियाVladimir Putinrussia