"...तर नववर्षाच्या सुरुवातीला कोरोनाचा विस्फोट, परिस्थिती आणखी गंभीर होणार"; WHO चा इशारा By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 12:22 PM 2020-12-17T12:22:22+5:30 2020-12-17T12:46:46+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी जारी केलेल्या एका इशाऱ्यामध्ये युरोपीयन देशांमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याचं म्हटलं आहे. जगभरात कोरोनाने थैमान घातले असून अनेक देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.
जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने सात कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने एक गंभीर इशारा दिला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी जारी केलेल्या एका इशाऱ्यामध्ये युरोपीयन देशांमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याचं म्हटलं आहे. तसेच नियमांचे पालन करण्याचं आवाहन केलं आहे.
WHO नाताळ हा सण साजरा करताना लोकांनी मास्क घातलं नाही आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले नाहीतर तर युरोपीयन देशांमध्ये कोरोनाचे संकट अधिक गंभीर होऊ शकतं असंही म्हटलं आहे.
लोकांनी नाताळनिमित्त चर्चमध्ये जाताना किंवा पार्ट्यांना जाताना मास्क नाही घातले तर नववर्षामध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्याचे पाहायला मिळू शकेल असा धोक्याचा इशाराही दिला आहे.
ब्रिटन, इटली, स्पेन, जर्मनी आणि फ्रान्ससारख्या देशांना नाताळाच्या कालावधीमध्ये कोरोनासंदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितलं आहे.
नाताळाच्या कालावधीमध्ये किती लोकांनी एकत्र यावे यासाठी नियम करावेत, एका ठिकाणी जास्त लोकांनी गर्दी होणार नाही हे पाहावे असंही डब्यूएचओने या देशांना सांगितलं आहे.
नाताळानिमित्त कोणाला पार्टी करायची असल्यास मोकळी मैदाने, घराचं अंगण आणि उघड्या जागांना प्राधान्य द्यावे. बंद जागी अनेकांनी भेटणं धोकादायक ठरु शकतं असं म्हटलं आहे.
हवा खेळती असणाऱ्या ठिकाणांना प्राधान्य दिल्यास संसर्गाचा धोका कमी आहे असंही डब्यूएचओने नमूद केलं आहे. तसेच लोकांनी नाताळ साजरा करण्यासंदर्भातील निर्णय गांभीर्याने घ्यावेत असाही सल्ला दिला आहे.
ब्रिटनमध्ये नाताळाच्या कालावधीमध्ये कोरोनासंदर्भातील निर्बंधांमध्ये सूट देण्यासाठी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर दबाव वाढत असल्याचं चित्र दिसत आहे.
अनेक नेत्यांनी तसेच अनेक बड्या चर्चेच्या प्रतिनिधींनी पंतप्रधानांकडे निर्बंधांमध्ये सूट देण्याची मागणी केली आहे. लोकांना नाताळ मोकळेपणे साजरा करता यावा यासाठी सूट देण्याची मागणी केली जात आहे.
ब्रिटननंतर आता अमेरिकेनेही अमेरिकन कंपनी फायझर आणि जर्मन फार्मा कंपनी बायोएनटेकद्वारे विकसित करण्यात येत असलेल्या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे.
ब्रिटननंतर आता अमेरिकेनेही अमेरिकन कंपनी फायझर आणि जर्मन फार्मा कंपनी बायोएनटेकद्वारे विकसित करण्यात येत असलेल्या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे.
अमेरिकेने कोरोनावरील लस तयार करणारी कंपनी मॉडर्नाकडूनही 100 दशलक्ष डोस विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, शुक्रवारी अमेरिकन सरकारच्या सल्लागार समितीने फायझरच्या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली.
फायझरनंतर आता अमेरिकेत आणखी एका लसीला परवानगी मिळण्याची दाट शक्यता आहे. मॉडर्नाने विकसित केलेली लस वापरण्यास परवानगी मिळणार असल्याची माहिती मिळत आहे.
शुक्रवारी अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या (FDA) बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मॉडर्ना कंपनीने करोनाला अटकाव करणारी लस विकसित केली आहे.
कोरोनाविरोधात लढण्यास लस सुरक्षित आणि सक्षम असल्याचा दावा करण्यात आला आहे. मॉडर्नाने जवळपास 30 हजार स्वयंसेवकांवर लस चाचणी केली होती. चाचणीत 94.1 टक्के लस प्रभावी असल्याचे दिसून आले आहे.