कोण होणार ख्रिस्ती धर्मीयांचा पुढचा पोप? ही पाच नावं शर्यतीत आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 09:56 IST2025-04-22T09:52:31+5:302025-04-22T09:56:57+5:30

Who Will Be The Next Pope : ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं सोमवारी वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झालं. व्हॅटिकनकडून त्यांच्या निधनाची औपचारिक घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल, याबाबतची चर्चाही सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पोपपदासाठी कुणाकुणाची नावं आघाडीवर आहेत, त्याचा घेतलेला हा आढावा.

ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं सोमवारी वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झालं. व्हॅटिकनकडून त्यांच्या निधनाची औपचारिक घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल, याबाबतची चर्चाही सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पोपपदासाठी कुणाकुणाची नावं आघाडीवर आहेत, त्याचा घेतलेला हा आढावा.

ख्रिस्ती धर्मियांच्या नव्या धर्मगुरूच्या निवडीच्या शर्यतीमध्ये लुईस अँटोनियो टेंगल यांचं नाव सध्या सर्वात आघाडीवर आहे. लुईस अँटोनियो यांचं वय ६७ वर्षे असून, त्यांना पोपपदाच्या शर्यतीमधील सर्वात प्रबळ दावेदार मानलं जात आहे. लुईस अँटोनियो हे दिवंगत पोप फ्रान्सिस यांच्या सर्वात निकटवर्तियांपैकी एक होते. तसेच पोपचं पद सांभाळण्यासाठी त्यांना पुरेसा अनुभव असल्याचं मानलं जात आहे.

पिएट्रो पारोलिन यांचं नाव व्हॅटिकनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये समाविष्ट आहे. ७० वर्षीय पारोलिन हे २०१३ पासून व्हॅटिकनचे परराष्ट्र मंत्री म्हणून काम पाहत आहेत. तसेच त्यांनी अनेक कुटनीतिक विषयांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. त्यात चीन आणि मध्य-पूर्वेतील संवेदनशील विषयांचाही समावेश आहे. व्हॅटिकनच्या प्रशासनावर त्यांची भक्कम पकड आहे. त्यामुळे पोपपदावरील त्यांचा दावाही भक्कम मानला जात आहे.

७६ वर्षीय पीटर तुर्कसन हे चर्चच्या सामाजिक न्यायाच्या वर्तुळातील एक प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी वातावरणातील बदल, गरिबी, आर्थिक न्याय अशा अनेक सामाजिक विषयांवर आवाज उठवलेला आहे. तुर्कसन यांची पोप म्हणून निवड झाली तर तो ऐतिहासिक क्षण असेल. याआधी इ.स. ४९२ ते ४९६ या काळात पोप गेलेसियस हे पहिले आफ्रिकन पोप ठरले होते. रोममध्ये आफ्रिकन आई-वडिलांच्या पोटी जन्मलेले गेलेसियस हे त्यांचं धार्मिक लेखन आणि गरिबांसाठी दानाच्या आग्रही भूमिकेमुळे ओळखले जातात.

पोपपदाच्या शर्यतीमध्ये ७२ वर्षीय पीटर एर्डो हए प्रमुक परंपरावादी उमेदवार आहेत. सन्माननीय कॅनन कायदेतज्ज्ञ असलेले पीटर एर्डो हे पारंपरिक कॅथोलिक शिकवण आणि तत्त्वज्ञानाचे प्रखर समर्थक आहेत. त्यांनी आधी युरोपियन बिशप संमेलनाच्या परिषदेचे प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. तसेच धार्मिक रुढीवादावर भर दिलेला आहे. ज्या लोकांना पोप जॉन पॉल आणि पोप बेनेडिक्ट सोळावे यांच्या प्रमाणे रुढी परंपरावादाकडे वळायचे आहे, त्यांच्यासाठी पीटर एर्डो हे चांगला पर्याय आहेत.

८२ वर्षीय कार्डिनल एंजेलो स्कोला हे दीर्घकाळापासून पोपपदाचे दावेदार आहेत. ते २०१३ च्या संमेलनामध्ये पसंतीच्या व्यक्तींपैकी एक होते. त्यावेळी पोप फ्रान्सिस यांची निवड झाली होती.