CoronaVirus : ...तर कोरोना व्हायरस कधीच संपणार नाही, WHOने दिला गंभीर इशारा By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 01:00 PM2020-05-14T13:00:14+5:302020-05-14T13:19:03+5:30Join usJoin usNext कोरोना व्हायरसबद्दल दरवेळी नवनवं खुलासे समोर येत असतात. एचआयव्ही या रोगासारखाच कोरोना व्हायरसही जाणार नाही. म्हणजेच त्यावर कोणताही उपाय सापडणार नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी एक व्हच्युअल पत्रकार परिषद घेतली. त्यात ही महत्त्वाची माहिती दिली आहे. डब्ल्यूएचओच्या इमर्जन्सी विभागाचे संचालक डॉ. माईक रेयान यांनी असा इशारा दिला आहे की, कोरोना व्हायरस हा कायमच राहू शकतो. लसीशिवाय जगभरातील लोकांची प्रतिकारकशक्ती वाढवण्यास बरीच वर्षे लागतील. हा व्हायरस एचआयव्हीसारखाच आपल्या समाजात कायम राहू शकतो. HIV विषाणूही हद्दपार झालेला नाही. मात्र, त्याला कसं हाताळायचं, हे आता आपण शिकलो आहोत. तसेच यालाही हाताळण्यास शिकावं लागणार आहे. एचआयव्हीवर बरेच उपचार केले गेले आहेत, परंतु अद्याप त्याचं समूळ उच्चाटन करता आलेलं नाही. तसेच त्यावर कोणतेही औषध तयार केलेले नाही. अनेक देश व्हायरसविरुद्ध लढा देण्याची तयारी करत आहेत आणि आपापल्या देशातील लॉकडाऊन संपवण्याच्या तयारीत आहेत, असंही जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे. बहुतेक देशांना अर्थव्यवस्था पुन्हा सुरू करणे आणि संक्रमण पुन्हा एकदा मोठ्या संख्येने येण्यापासून रोखणे यामध्ये संतुलन राखणे अवघड असल्याचंही त्यांनी सांगितलं. लस तयार करून जगभर वितरीत करणे कठीण डॉक्टर रेयान यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसची लस जरी बनविली गेली तरी जगभरात ती पोहोचवणे अवघड आहे. या विषाणूशी संबंधित प्रत्येक टप्पा हा आव्हानांनी भरलेला आहे. त्याच वेळी, डब्ल्यूएचओच्या तांत्रिक लीड मारिया व्हॅनने म्हटले आहे की, कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या आरोग्य संकटातून बाहेर पडण्यासाठी काही काळ लागेल, यासाठी मनाला तयार करायला हवं." विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून कोरोनावर रामबाण उपाय म्हणून एक औषध व्हायरल होत आहे. आयुष मंत्रालयातील हे औषधही मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे. आर्सेनिकम अल्बम 30 असं त्या होमिओपॅथिक औषधाचं नाव आहे. डॉ. ममता व्यास (होमिओ हर्बल क्लिनिक)च्या माहितीनुसार आर्सेनिकम अल्बम 30चा उपयोग ताप, घसा खवखवणे, श्वास घेण्यात त्रास, कफ, चिंता यांसारख्या अनेक आजारांसाठी केला जातो. प्रत्येक मानवी शरीर वेगवेगळ्या प्रकारे एकाच औषधावर काम करू शकते. आजार असूनही प्रत्येक रुग्णाला वेगवेगळी लक्षणे दिसू शकतात. आर्सेनिकम अल्बम 30 कोरोनाच्या रुग्णावर उपचार करत नाही, परंतु त्याचा वापर रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी केला जाऊ शकतो. होमिओपॅथी औषधे नेहमीच अल्प प्रमाणात दिली जातात. जास्त प्रमाणात घेतल्यास हे खूप हानिकारक आहे.Read in Englishटॅग्स :कोरोना वायरस बातम्याजागतिक आरोग्य संघटनाcorona virusWorld health organisation