लॉस एंजल्समध्ये वेगाने पसरतोय वणवा By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2017 03:58 PM 2017-12-07T15:58:45+5:30 2017-12-07T16:11:17+5:30
अमेरिकेच्या पश्चिमेस असणाऱ्या लॉस एंजल्सच्या उत्तरेस लागलेला वणवा वेगाने पसरत चालला आहे. सॅंटा अॅना या वेगवान वाऱ्यांमुळे ही आगही ताशी पन्नास मीटर वेगाने पुढे सरकत आहे.
या आगीमुळे 2 लाख 45 हजार एकर इतक्या क्षेत्रावरचे जंगल नष्ट झाले असून 8900 कुटुंबांना आपली घरे मोकळी करुन बाहेर पडावे लागले आहे.
लॉस एंजल्सच्या वायव्येस असणाऱ्या व्हेंचुरा या डोंगराळ प्रदेशात आणि व्हेंचुरा कंट्री येथे सर्वात जास्त नुकसान झाले आहे.बेल एअरमध्ये मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
लॉस एंजल्स पोलिसांनी ब्रेन्टवूड येथील पोलिसांना आपली घरे मोकळी करण्याचे आदेश दिले असून अनेक गावांमधील नागरिकांनी कालपासून घरे मोकळी करण्यास सुरुवात केली आहे.
या वणव्याला नैसर्गिक संकट म्हणून घोषित करण्यात आले आहे.