इंडिया होणार भारत? याआधी जगातील या देशांनी बदललंय आपलं नाव, पाहा संपूर्ण यादी By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 06:54 PM 2023-09-05T18:54:53+5:30 2023-09-05T19:13:37+5:30
India or Bharat: या महिन्यात होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर देशाचं इंग्रजीतील इंडिया हे नाव बदलून भारत करणार येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्यासाठी सरकारकडून संसदेत एक विधेयकही सादर होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या महिन्यात होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर देशाचं इंग्रजीतील इंडिया हे नाव बदलून भारत करणार येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्यासाठी सरकारकडून संसदेत एक विधेयकही सादर होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आता सरकारकडून देशाच्या नावात खरोखरच बदल होणार आहे की नाही, हे पुढच्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. मात्र आतापर्यंत जगातील अनेक देशांनी आपल्या नावात बदल केलेला आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे या देशांनी आपलं नाव बदललेलं आहे. या देशांची यादी पुढीलप्रमाणे आहे.
श्रीलंका इंग्रजांच्या काळात श्रीलंकेला सिलोन या नावाने ओळखलं जात असे. मात्र २० व्या शतकात स्वातंत्र्यलढा सुरू झाल्यावर देशाचं नामकरण श्रीलंका करण्याच्या मागणीने जोर धरला. त्यानंतर १९७२ मध्ये देशाचं अधिकृतपणे द रिपब्लिक ऑफ श्रीलंका असं नामकरण करण्यात आलं. त्यानंतर १९७८ मध्ये ते डेमोक्रॅटिक सोशालिस्ट ऑफ श्रीलंका असं नामकरण करण्यात आलं.
बोत्सवाना मार्च १८८५ मध्ये ब्रिटनने बोत्सवानाचं अधिकृत नाव बेचुयानालँड असं ठेवलं. मात्र ३० सप्टेंबर १९६६ रोजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचं नामकरण बोत्सवाना असं करण्यात आलं.
इथिओपिया इथिओपियाच्या उत्तर भागावर आधी अबीसीनिया साम्राज्याची सत्ता होती. मात्र दुसऱ्या महायुद्धादरम्यान राजा हेले सेलासी ने देशाचं नाव बदलून ते अबीसीनिया ऐवजी इथिओपिया असं केलं.
जॉर्डन मध्य-पूर्वेतील देश असलेल्या जॉर्डनवर ब्रिटिशांची सत्ता असताना त्याचं नाव ट्रांजॉर्डन असं ठेवण्यात आलं होतं. त्याला १९४६ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि १९४९ मध्ये देशाचं नाव पुन्हा एकदा बदलून किंग्डम ऑफ जॉर्डन असं ठेवण्यात आलं.
म्यानमार म्यानमारला आधी बर्मा म्हटलं जात होतं. लष्करी सरकारने १९८९ मध्ये देशाचं नाव म्यानमार केलं.
तुर्की तुर्की हा देश आता तुर्कीए म्हणून ओळखळा जातो. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दौगन यांनी हल्लीच देशाचं नामकरण तुर्कीए करण्याची घोषणा केली होती.
हॉलंड (द नेदरलँड) सन २०२० मध्ये हॉलंडच्या सरकाने आपल्या देशाचं नाव बदलून द नेदरलँड करण्याचा निर्णय घेतला. या देशाचे दक्षिण हॉलंड आणि उत्तर हॉलंड असे दोन भाग आहेत.
चेक प्रजासत्ताक (चेकिया) एप्रिल २०१६ पासून चेक प्रजासत्ताक चेकिया या नावाने ओळखले जाऊ लागले. या आधी या देशाला बोहेमिया या नावानेही ओळखले जात असे.
इराण मार्च १९३५ पूर्वी इराणचं नाव फारस होतं. मात्र १९३५ मध्ये येथील सरकारने आपले राजनैतिक संबंध असलेल्या देशांनी आपल्याला इराण असे संबोधावे सांगितले.
सियाम (थायलंड) सियाम या देशाचं नाव १९३९ मध्ये बदलून थायलंड असं करण्यात आलं. त्यावेळी येथे राजेशाही होती. स्थानिक भाषेत या देशाला prathet thai असं संबोधतात. याचा अर्थ स्वतंत्र लोकांचा देश असा होतो.