तब्बल ६ किलो वजनाचं बाळ, अनेकदा गर्भपात झाल्यानंतर जोडप्याच्या आयुष्यात घडला चमत्कार By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 06:58 PM 2021-10-18T18:58:35+5:30 2021-10-18T19:30:14+5:30
जन्म झाल्यानंतर साधारणत: बाळाचे वजन २ ते ३ किलो असते पण तुम्ही कधी ६ किलोचं बाळ जन्माला आल्याचं ऐकलंय का? एका जोडप्याच्या आयुष्यात अनेकवेळा मिस्कॅरेज झाल्यानंतर एक चमत्कार झाला. त्यांच्या पोटी तब्बल ६ किलो वजनाचं बाळ जन्माला आलं... Arizona येथील बॅनर थंडरबर्ड मेडिकल सेंटरमध्ये ४ ऑक्टोबर रोजी जन्म झालेल्या एका चिमुकल्याने सर्वांनाच हैराण केलं.
कॅरी पटोनाइने (Cary Patonai) ३८ आठवड्यांच्या प्रेग्नेंसीमध्ये तिसऱ्या मुलाला फिनली (Finnley) याला जन्म दिला.
जन्म झाला त्यावेळी फिनलीचं वजन साडे सहा किलो होतं. त्यांची उंची २३.७५ इंच होती.
या महिलेची डिलिव्हरी करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं, की २७ वर्षांच्या करियरमध्ये कधीही इतक्या मोठ्या मुलाला पाहिलं नाही.
कॅरी पटोनाइला अचानक लेबर पेन सुरू झाल्याने तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ४ ऑक्टोबर रोजी कॅरीने ३८ आठवड्यांनंतर फिनलीला जन्म दिला.
कॅरीला सी सेक्शनसाठी नेण्यात आलं. त्यानंतर तिने साडे सहा किलो वजनाच्या बाळाला जन्म दिला.
या बाळाचं वजन, त्याचा इतका मोठा आकार पाहून डॉक्टरही हैराण झाले. याआधी त्यांनी कधीही इतकं मोठं बाळ गर्भातून बाहेर येताना पाहिलं नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
सर्वसाधारणपणे बाळाच्या जन्मावेळी त्याचं वजन जवळपास दोन ते अडीच किलो असतं. परंतु फिनलीचं वजन साडे 6 किलो होतं. त्याला पाहून सर्वच जण हैराण झाले.
फिनलीला पाहिल्यानंतर मेडिकल टीमला त्याच्यासाठी स्पेशल डायपर ऑर्डर करावे लागले, कारण त्यांच्याकडे डायपरची इतकी मोठी साइजच नव्हती.
फिनलीसाठी जन्मानंतर घालण्यासाठी लागणारे कपडेही पुन्हा आणावे लागले. ज्या साइजचे कपडे आणले होते, ते त्याला होत नसल्याने पुन्हा नवीन कपडे मागवावे लागले.