चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 08:40 PM2024-09-26T20:40:45+5:302024-09-26T20:44:16+5:30

World 5 Most Dangerous Missiles: मागच्या काही वर्षांपासून चीन ज्या पद्धतीने आपल्याकडील हत्यारांची संख्या वाढवत आहे त्यामुळे जगभरात चिंता वाढली आहे. यादरम्यान, चीनने पॅसिफिक महासागरात आपल्या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डीएफ-४१ ची चाचणी घेतली आहे. चीनचं हे क्षेपणास्त्र थेट अमेरिकेपर्यंत पोहोचू शकतं. त्या पार्श्वभूमीवर आपण आज जगातील सर्वात धोकादायक क्षेपणास्त्रांची माहिती घेऊयात.

मागच्या काही वर्षांपासून चीन ज्या पद्धतीने आपल्याकडील हत्यारांची संख्या वाढवत आहे त्यामुळे जगभरात चिंता वाढली आहे. यादरम्यान, चीनने पॅसिफिक महासागरात आपल्या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डीएफ-४१ ची चाचणी घेतली आहे. चीनचं हे क्षेपणास्त्र थेट अमेरिकेपर्यंत पोहोचू शकतं. त्या पार्श्वभूमीवर आपण आज जगातील सर्वात धोकादायक क्षेपणास्त्रांची माहिती घेऊयात.

RS-28 सरमत हे जगातील खतरनाक क्षेपणास्त्र आहे. रशियाच्या या क्षेपणास्त्राचा वेग मॅक २० पेक्षा अधिक आहे. म्हणजे ती २४ हजार ५०० किमी प्रति तास वेगाने जाते. तसेच ती १८ हजार किमी एवढ्या अंतरापर्यंत हल्ला करू शकते. तसेच सोबत अण्वस्त्रेही वाहून नेऊ शकते. एवढंच नाही तर कुठल्याही मिसाईल डिफेन्स सिस्टिमला उद्ध्वस्त करू शकते.

चीनने आताच या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे. हे क्षेपणास्त्र १३ हजार ६२५ किमी वेगाने जाऊ शकते. तसेच १५ हजार किमी अंतरापर्यंत हल्ला करू शकते. त्याची रेंज अमेरिकेपर्यंत आहे.

हे अमेरिकेच्या पाणबुडीतून प्रक्षेपित करता येणारे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. ते २९ हजार ४०० किमी प्रति तास वेगाने सुमारे १२ हजार किमी अंतरापर्यंत हल्ला करू शकते. हे क्षेपणास्त्र अमेरिकेच्या ओहियो क्रास आणि यूके वॅनगार्ड क्लासच्या क्षेपणास्त्रावर तैनात आहे.

ह्वासोंग-१५ ( उत्तर कोरिया) ह्वासोंग-१५ हे किम जोंग उनच्या उत्तर कोरियाकडे असलेलं सर्वात शक्तिशाली आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे. त्याचा वेग २७ हजार किमी प्रति तास एवढा आहे. तसेच ते १३ हजार किमीपर्यंत हल्ला करू शकते. हे क्षेपणास्त्र अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे. तसेच ते अमेरिकेपर्यंत हल्ला करू शकते.

ब्राह्मोस-II हे क्षेपणास्त्र भारत आणि रशिया यांनी एकत्रितपणे विकसित केलं आहे. हे सध्या विकसनशिल अवस्थेत आहे. हे क्षेपणास्त्र ८ हजार ५७५ ते ९८०० किमी प्रतितास वेगाने हल्ला करू शकतं. तसेच त्याची मारक क्षमता ६०० किमी एवढी आहे. हे जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांपैकी एक आहे.