World Earth Day 2019: How to Celebrate World Earth Day?
World Earth Day 2019: जागतिक वसुंधरा दिन कसा साजरा कराल? By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 04:16 PM2019-04-22T16:16:21+5:302019-04-22T16:20:01+5:30Join usJoin usNext पृथ्वीवरील पर्यावरणाचा समतोल राखण्यात सर्वात मोठी भूमिका आहे. वाढते प्रदूषण आणि अयोग्य जीवनशैली यामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी धोक्यात आहे. पाणी, जंगले यांसारख्या पृथ्वीवरच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा भसाभस अविचारी वापर केल्याने आणि वाढत्या प्रदुषणाचे परिणाम दिसतच आहेत. पृथ्वीचे संतुलन कायम ठेऊन तिच्यावरील जीवसृष्टी जिवंत ठेवण्यासाठी 22 एप्रिल हा दिवस ‘जागतिक वसुंधरा दिन’ म्हणून जगभर साजरा केला जातो. अमेरिकेचे गेलॉर्ड नेल्सन हे वसुंधरा दिनाचे जनक आहेत. त्यांनी अमेरिकेतील दोन कोटींपेक्षा जास्त लोकांमध्ये पर्यावरणाच्या समस्यांबाबत जागृती केली. 1970 मध्ये ही प्रथा सुरू झाली. वाढत्या तापमानाला तोंड देण्यासाठी सरकारबरोबरच प्रत्येक नागरिकांनी आपले कर्तव्य पार पाडून नष्ट होत असलेल्या प्रजातीचे संरक्षण करणे गरजेचे आहे. हा वसुंधरा दिन साजरा करण्यासाठी जगभरातील पर्यावरणवादी कार्यकर्ते इंटरनेटच्या माध्यमातून एकत्र येतात. वृक्षारोपणासोबतच प्रदुषण कमी करण्याची नितांत आवश्यकता आहे. अन्यथा ही पृथ्वी आपल्याला माफ करणार नाही, झाडे लावा, झाडे जगवा, कंपोस्ट करणे, ओला कचरा आणि सुका कचरा या योग्य विभागणी करणे हे आपल्या हातात आहे. कागद, काचेच्या बाटल्या, प्लास्टिक या कच-यासाठी वेगळी हाताळणी करणे, वाहतूकीची सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा. जिथे शक्य तिथे सायकल/ पायी चालणे, प्लास्टिक पिशव्यांचा कमीत कमी वापर करणे यासारख्या गोष्टी आपण करु शकतो.टॅग्स :वातावरणपृथ्वीenvironmentEarth