जग हादरले! युद्धखोर चीनने मिसाईल डागली; हिमालयाच्या नजिकचे लोकेशन By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 08:37 PM 2020-09-09T20:37:33+5:30 2020-09-09T20:43:27+5:30
india china faceoff : चीनच्या सैनिकांनी सीमेलगत मोठ्या प्रमाणावर युद्धसराव सुरु केला असून रणगाड्यांसह 100 लष्करी वाहनांमधून जवळपास 1000 सैनिकांनी तळ ठोकला आहे. याचा व्हिडीओच चीनने जारी केला आहे. चीनने पुन्हा एकदा जगाला चिंतेत टाकणारे कृत्य केले आहे. लाईव्ह फायर ड्रीलमध्ये जवानांना मिसाईल कशी डागतात याचे प्रात्यक्षिक दिले आहे. चीनच्या पीएलएची 77 वी बटालियनने ही मिसाईल लाँच केली. महत्वाचे म्हणजे 1962 च्या युद्धात याच बटालियनने भारतावर हल्ला केला होता.
या बटालियनचा हा युद्धसराव हिमालयाच्या आसपासच कुठेतरी डोंगररांगांमध्ये होत आहे. या बटालियनला उंच डोंगरदऱ्यांमध्ये युद्धाचा अनुभव आहे. याच बटालियनने भारतासह जपान, कोरिया आणि व्हिएतनामसोबत युद्ध केले होते.
HQ-16 ही मध्यम पल्ल्याची मिसाईल आहे. याची रेंज 40 ते 70 किमी आहे. ही क्रूज मिसाइल, फाइटर जेट्स किंवा कमी क्षमतेच्या बॅलेस्टिक मिसाईलवर हल्ला करू शकते.
ही मिसाईल एअर डिफेन्स सिस्टिममध्ये वापरण्यात येते. याचा मुख्य उद्देश आकाशातून येणाऱ्या संकटावर हल्ला करून संपविणे हा आहे.
HQ-16 मिसाईलचे पूर्ण नाव हॉन्ग की-16 आहे. चीनने रशियाच्या बक-एम2 मिसाइलची नक्कल करत ही मिसाईल बनविली आहे. ही मिसाईल ट्रकवर लोड केली जाते. तसेच लढाऊ जहाजे आणि पाणबुड्यामध्येही ही वापरता येते.
या मिसाईल परिक्षणाचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. हा भाग वाळवंटी प्रदेश आहे. चीनने कोरोनाच्या आडून यंदा मोठमोठे युद्धाभ्यास केले आहेत. यामध्ये खरी शस्त्रास्त्रे वापरली आहेत. सर्वात मोठा युद्धाभ्यास चीनने 29 मार्चला केला होता. तेव्हा कोरोनाच्या उंबरठ्यावर जग होते.
यानंतर 11 एप्रिलला युद्धाभ्यास केला होता. तैवान, भारत यांना डोळ्यासमोर ठेवून हा युद्धाभ्यास झाला होता.
चीनने लडाखपासून 600 किमी दूरवर अण्वस्त्रधारी विमाने, मिसाईल तैनात केली आहेत. या मिसाईलचे नाव आहे DF-26/21.
ही मिसाईल शिनजियांग प्रांताच्या कोर्ला आर्मी बेस (Korla Army Base) वर तैनात केली आहे. याशिवाय कैलास पर्वताच्या जवळ मोठा मिसाईल बेस तयार करत आहे.
चीनच्या सैनिकांनी सीमेलगत मोठ्या प्रमाणावर युद्धसराव सुरु केला असून रणगाड्यांसह 100 लष्करी वाहनांमधून जवळपास 1000 सैनिकांनी तळ ठोकला आहे. याचा व्हिडीओच चीनने जारी केला आहे.
चीनने लाईव्ह फायर ड्रील करत असल्याचे म्हटले आहे. हे सैनिक 100 गाड्यांमधून इथे पोहोचले आहेत. त्यांनी चीनच्या रेल्वेलाईनद्वारे 2000 किमीचा प्रवास केला आहे.
या लाईव्ह फायर ड्रीलमध्ये तोफा, रणगाडे आणि मिसाईल वापरण्यात येणार आहेत. सीजीटीएनचा न्यूज प्रोड्युसर शेन शी वेई याने याचा व्हिडीओ पोस्ट करून ''वाट पहा'' असे म्हणाला आहे.