मेगन मार्केल व प्रिन्स हॅरीच्या मेणाच्या पुतळ्याचं अनावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2018 15:34 IST2018-05-09T15:34:24+5:302018-05-09T15:34:24+5:30

मेगन मार्केल व प्रिन्स हॅरी या दोघांच्या चाहत्यांना आता त्यांच्यासोबत फोटो काढणं सोपं झालं आहे.

लंडनच्या मादाम तुसाँ वॅक्स म्युझियममध्ये मेगन व प्रिन्स हॅरीच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.

लवकरच प्रेक्षकांसाठी हा पुतळा पाहण्याचं प्रदर्शन सुरु होणार आहे.

मेगन मार्केलचा हिरव्या रंगातील ड्रेस परिधान केलेला पुतळा तयार करण्यात आला आहे. मेगनच्या हातातील अंगठीप्रमाणे पुतळ्यालाही अंगठी तयार करण्यात आली आहे.