Worlds largest Starbucks Reserve Roastery now open in Tokyo
स्टारबक्सचा जगातला सर्वात मोठा कॅफे पाहिलात का? By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 03:20 PM2019-03-03T15:20:44+5:302019-03-03T15:28:09+5:30Join usJoin usNext कॉफी आणि स्टारबक्स हे समीकरण संपूर्ण जगभरात पाहायला मिळातं. जपानची राजधानी टोकियोमध्ये स्टारबक्सनं जगातला त्यांचा सर्वात मोठा कॅफे सुरू केला आहे. जपानमधील अनेक कॅफे आणि हॉटेल रोबोट्समुळे चर्चेत असताना आता भव्यदिव्य स्टारबक्स कॅफे सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. जगातला सर्वात मोठा स्टारबक्स 32 हजार चौरस फूटांचा आहे. हा कॅफे चार मजल्यांचं आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर बेकरी आणि कॅफे आहे. स्टारबक्सच्या दुसऱ्या मजल्यावर टीवना टी रुम आहे. हा जगातील सर्वात मोठा टीवना टी रुम आहे. या ठिकाणी 20 प्रकारचा चहा मिळेल. तिसऱ्या मजल्यावर अरिविअमो कॉकटेल बार आहे. या ठिकाणी कॉफीपासून तयार होणारे पदार्थ मिळतील. चौथ्या मजल्यावर रोस्टिंग फॅक्टरी आहे. या ठिकाणी स्टारबक्सचा सर्वात मोठा रोस्टर आहे. याशिवाय मोठा लॉन्ज एरियादेखील आहे. स्टारबक्सच्या अगदी मोजक्या कॅफेंमध्ये रोस्टर आहे. त्यात आता टोकियोतील या कॅफेचा समावेश झाला आहे. रोस्टर असलेला हा स्टारबक्सचा पाचवा कॅफे आहे. टॅग्स :जपानJapan