World's last male northern white rhino Sudan dies Ol Pejeta Conservancy in Kenya
अखेर सुदानचा 'एकटेपणा' संपला By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 10:49 PM2018-03-20T22:49:54+5:302018-03-20T22:49:54+5:30Join usJoin usNext जगाच्या पाठीवरील शेवटचा पांढरा नर गेंडा असणाऱ्या सुदानचा केनियातील ओल पेजेटा अभयाअरण्यात मृत्यू झाला. २००९ साली दोन माद्यांसह त्याला चेक रिपब्लिक येथून ओल पेजेटा अभयारण्यात आणण्यात आले होते. तो ४५ वर्षांचा होता. त्याचं नाव सुदान असं ठेवण्यात आलं होतं. २००९ साली दोन माद्यांसह त्याला चेक रिपब्लिक येथून ओल पेजेटा अभयारण्यात आणण्यात आले होते. तो ४५ वर्षांचा होता. त्याचं नाव सुदान असं ठेवण्यात आलं होतं. जगात एकूण चारच पांढरे गेंडे होते. त्यात सुदान हा एकमेव नर होता. त्याच्या सोबत दोन माद्या केनियातील अभयारण्यात आहेत. या प्रजातीच्या वंशवृद्धीसाठी अनेक ब्रीडिंगचे प्रयोग करण्यात आले पण त्यांना फारसं यश आलं नाही. सुदानचं वय वाढलं होतं, तो वृद्ध झाला होता. त्याचप्रमाणे त्याच्या पायातली ताकदही हळूहळू क्षीण होत गेली होती. आपल्या पायावर उभं राहण्यासही त्याला त्रास होत होता. ओल पेजेटा हे अभयारण्य गेंड्यांच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या संक्षणासाठी तसेच तस्करांपासून सुदानला वाचवण्यासाठी कडक सुरक्षा पुरवण्यात आली होती. टॅग्स :वन्यजीवसोशल व्हायरलwildlifeSocial Viral