The world's most beautiful and pleasant railway journey
जगातील सर्वात सुंदर, सुखद व नयनरम्य रेल्वे प्रवास ! By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2017 09:13 PM2017-09-14T21:13:23+5:302017-09-14T21:29:23+5:30Join usJoin usNext न्यूझीलंडच्या दक्षिण आयलंडच्या क्राइस्टचर्च व ग्रेमाऊथदरम्यान धावणा-या ट्रेनचा प्रवास फारच सुखकर असतो. वायमाकारीरी नदीच्या वरून धावणा-या या ट्रेनमधून बर्फांनी आच्छादलेल्या पर्वत रांगा पाहायला मिळतात. जगभरातील रेल्वे सेवांमधील ट्रांजअल्पाइन ही सर्वात चांगली रेल्वे सेवा आहे. ट्रान्स सायबेरिन रेल्वे व्हादिवोस्तोकपासून मॉस्कोपर्यंत 14 दिवसांचा प्रवास करते. या प्रवासात नेत्रदीपक आनंद उपभोगायला मिळतो. शोंगोलोलो एक्सप्रेस दक्षिण आफ्रिका, नामीबिया, स्वित्झर्लंड मोजाम्बिक आणि झिम्बाब्वेतून जाते. 1995 साली सुरू झालेल्या रेल्वेतून निसर्गाचं नयनरम्य दृश्य पाहायला मिळते. या ट्रेननं 12 ते 15 दिवसांचा प्रवास करावा लागतो. वेनिस सिम्प्लॉन-ओरिएंट एक्स्प्रेसही युरोपातली शानदार ट्रेन आहे. या ट्रेनमध्ये तुम्हाला चांगलं जेवण मिळते. आल्प्स पर्वताला जोडणा-या ग्लेशियर एक्स्प्रेसमधून प्रवाशांना स्वित्झर्लंडमधील निसर्ग सौंदर्याची अनुभूती मिळते. उत्तर अमेरिकेतली सर्वात सुंदर रेल्वे यात्रा कॅलिफोर्निया जेफिर सॅन फ्रान्सिस्कोला शिकागोशी जोडते. ही ट्रेन नेब्रास्का आणि डेनवरहून जाते.