This is the world's most beautiful river
ही आहे जगातील सर्वात सुंदर नदी By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 10:19 PM2018-10-22T22:19:15+5:302018-10-22T22:29:25+5:30Join usJoin usNext दऱ्याखोऱ्यांमधून झुळुझुळू वाहणाऱ्या नद्यांचं सौंदर्य पाहण्यासारखं असतं. मात्र कोलंबियातील क्रेनो क्रिस्टल या नदीच्या सौंदर्याचं वर्णय शब्दात करता येणार नाही. वर्षातील काही महिने ही नदी बाकी नद्यांप्रमाणे सामान्य असते. मात्र जुलै ते नोव्हेंबरदरम्यान या नदीचे पात्र सप्तरंगी होते. वेगवेगळ्या रंगाची मुक्त उधळण झाल्याने नदीचे पात्र सप्तरंगी झाल्यासारखे भासते. जुलै ते नोव्हेंबर या काळात नदीच्या पात्रात मॅकरेनिया क्लेविग्रा नावाची रोपे उगवतात. त्यामुळे नदीतील पात्र विविधरंगी होते. मॅकरेनिया क्लेविग्राच्या रोपांमुळे नदीच्या पात्रात हिरवा, नारिंगी, लाल, पिवळा आणि निळ्या रंगाची उधळण झाल्याचा भास होतो. टॅग्स :आंतरराष्ट्रीयपर्यटनInternationaltourism