This is the world's most dangerous road, on foot, with the death
हा आहे जगातील सर्वात धोकादायक रस्ता, पावला पावलावर होतो मृत्यूशी सामना By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 03:30 PM2019-05-18T15:30:29+5:302019-05-18T16:03:25+5:30Join usJoin usNext डोंगर दऱ्यांच्या कडेने जाणाऱ्या रस्त्यांवरून प्रवास करतानाचा थरार तुम्ही कधी ना कधी अनुभवला असेलच. पण या जगात असाही एक रस्ता आहे जिथून प्रवास करणे म्हणजे थरारक अनुभव असतो. जाणून घेऊया या रस्त्याची वैशिष्ट्ये. रोड ऑफ डेथ ( बोलिव्हिया) एकीकडे उंच पर्वत आणि खाली खोल दरी यांच्या मध्ये असलेल्या चिंचोळ्या मार्गातून जाणाऱ्या बोलिव्हियातील या रस्त्यावरून प्रवास करताना प्रवासी श्वास रोखून धरतात. येथून प्रवास करणे म्हणजे थेट मृत्यूशीच सामना करणे मानले जात असल्याने या मार्गाला रोड ऑफ डेथ म्हणतात. जगातील सर्वात धोकादायक रस्ता मानल्या जाणाऱ्या या रस्त्याची लांबी सुमारे 64 किमी आहे. हा संपूर्ण रस्ता अरुंद आणि निसरडा असल्याने येथून जाताना वाहनांची चाके अनेकदा दरीच्या दिशेने घसरतात. हा रस्ता खूप अरुंद असल्याने येथून एकावेळी दोन गाड्या जाऊ शकत नाहीत. त्यामुळे जर कधी दोन गाड्या एकमेकांसमोर आल्या तर खूप अचडणींचा सामना करावा लागतो. रस्ता अरुंद असल्याने गाड्या घसरून येथे खूप मोठ्या प्रमाणावर अपघात होतात. अनेकदा टायर घसरून गाड्या खोल दरीत पडतात. दरवर्षी येथे होणाऱ्या अपघातांमध्ये सुमारे 200 ते 300 लोकांचा मृत्यू होतो. सुमारे 15 हजार 400 फूट उंचीवर असलेला हा मार्ग अरुंद आणि धोकादायक असला तरी येथून वाहनांची रहदारी मोठ्या प्रमाणावर सुरू असते. टॅग्स :आंतरराष्ट्रीयInternational