The world's only drone that will keep Umbrella safe in a rainy environment
जगातली अशी ड्रोन अम्ब्रेला जी पावसाळी वातावरणात ठेवेल सुरक्षित By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2019 04:57 PM2019-08-09T16:57:44+5:302019-08-09T17:03:29+5:30Join usJoin usNext पावसाळ्यात छत्री घेतल्याशिवाय लोक घराबाहेर पडत नाहीत. बऱ्याचदा लोक घाई गडबडीत छत्री नेण्यास विसरतात. त्यांना नाइलाजास्तव भरपावसात भिजावं लागतं. पण एक अशीही छत्री आहे जिला हातात पकडावं लागत नाही. ती स्वयंचलित असून, ती व्यक्तीच्या डोक्यावर आपोआप उडत राहते. या ड्रोन अम्ब्रेलात एक कॅमेरा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात आला आहे. या मुळे या अम्ब्रेलाला आपल्या वापरकर्त्याला ट्रॅक करणे आणि फॉलो करणे शक्य झाले आहे. ही अम्ब्रेला वापरकर्त्याच्या डोक्यावर थोडेसे वर उडत राहत ड्रोन प्रमाणे त्याच्या सोबत जात राहते. या अम्ब्रेलाचा उपयोग पावसात आणि उन्हात करता येणार आहे. या छत्रीत मॅन्युअल कंट्रोल, एक ऑटोमॅटिक 'फॉलो मी' मोड आणि इतर अनेक फन्क्शन्स आहेत. या अम्ब्रेलाचा उपयोग पावसात आणि उन्हात करता येणार आहे. या छत्रीत मॅन्युअल कंट्रोल, एक ऑटोमॅटिक ‘फॉलो मी’ मोड आणि इतर अनेक फन्क्शन्स आहेत.