worlds weirdest bizarre and most strange unusual airlines
जगभरातील 'या' अजब एअरलाईन्सने एकदा तरी नक्की प्रवास करा By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 03:53 PM2018-08-06T15:53:44+5:302018-08-06T16:46:56+5:30Join usJoin usNext विमानाने प्रवास करताना प्रवाशांचा प्रवास उत्तम व्हावा यासाठी सर्वच एअरलाईन्स प्रवाशांना अनेक सेवा सुविधा देत असतात. मात्र जगात काही अजब एअरलाईन्स आहेत. या एअरलाईन्स कोणत्या हे जाणून घेऊया... एका जर्मन ट्रॅव्हल एजन्सीने 2008मध्ये जगातील सर्वात पहिली न्यूड एअरलाईन लाँच केली होती. या न्यूड एअरलाईन्समध्ये प्रवाशांना समर ट्रिपसाठी जर्मनी ते बाल्टिक सागरदरम्यान हवाई सफर केली जाते. इव्हा एअरलाईनमधील सर्व गोष्टी या हॅलो किटी या थीमवर आधारित आहेत. पॅसेंजर सीट, पाण्याचा ग्लास, नॅपकीन या सर्व गोष्टी हॅलो किटी थीमनूसार आहेत. केएलएम रॉयल डच या एअरलाईन्सने प्रवाशांसाठी Meet and Seat ही सर्विस लाँच केली आहे. यामध्ये प्रवाशांना त्यांच्यासोबत प्रवास करणारे को-पॅसेंजर फेसबुक प्रोफाईल पाहून निवडता येतात. ला कम्पॅग्नी एअरलाईन्समध्ये प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशासाठी एक मसाज खुर्ची, टॅबलेट तसेच अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. एअर माल्टा या एअरलाईन्सने जुलै 2015 पासून प्रवाशांचा प्रवास आरामदायी होण्यासाठी फ्रि मसाज देण्याची सुविधा सुरू केली आहे. एअर न्यूझीलँड या फ्लाईटमध्ये न्यूझीलँड ते लॉस एंजेलिस दरम्यान प्रवास करणाऱ्या लोकांना सीट नाही तर पूर्ण काऊच दिले जाते. त्यामुळेच ते कुटुंबीयांसमवेत झोपून प्रवास करू शकतात. VietJet या एअरलाईन्समध्ये एअर होस्टेस या प्रवाशांना खूश करण्यासाठी बिकिनीमध्ये असतात.टॅग्स :विमानairplane