चिंताजनक!...तर प्राणिसंग्रहालयातही दिसणार नाहीत हे वन्यजीव By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 02:29 PM 2019-11-15T14:29:46+5:30 2019-11-15T14:58:37+5:30
मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाच्या होत असलेल्या अपरिमित हानीमुळे अनेक वन्यजीवांसमोर अस्तित्वाचे संकट निर्माण झाले आहे. जगभरात पशुपक्ष्यांच्या सुमारे 27 हजार विविध प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे काही दुर्मीळ प्राणी आणि भावी पिढ्यांना प्राणीसंग्रहालयातही पाहायला मिळणार नाहीत. जाणून घेऊया अशा काही वन्यजीवांविषयी.
ओरांग उटान इंडोनेशियात आढळणारी माकडाची ही प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. या प्राण्याचा अधिवास असलेली जंगले ताडाच्या लागवडीसाठी तोडली जात आहेत. त्यामुळे या प्रजातीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
दक्षिण चिनी वाघ वाघांची ही प्रजात जंगलातून जवळपास नामशेष झाली आहे. या या प्रजातीचे काही वाघ केवळ प्राणीसंग्रहालयात शिल्लक आहेत.
सुंडा पेंगोलीन खवले मांजराच्या काही प्रजातीमधली सुंडा पँगोलीन ही प्रजाती विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे. त्याशिवाय चिनी पँगोलीनच्या अस्तित्वावरसुद्धा संकट आलेले आहे.
जावामधील गेंडे गेंड्यांच्या अनेक प्रजाती आहेत. मात्र एकशिंगी गेंड्यांची प्रजाती दुर्मीळ आहे. इतर गेंड्यांपेक्षा ते आकारानेसुद्धा लहान असतात. दरम्यान या गेंड्यांपैकी काही गेंडे जावामधील उजुंग कुलोन नॅशनल पार्कमध्येच उरले आहेत.
सुमात्रामधील वाघ जंगलांची मोठ्या प्रमाणावर कत्तल झाल्याने सुमात्रामधील वैशिष्ट्यपूर्ण वाघांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
बेट्रियन उंट चीन आणि मंगोलियामध्ये आढळणारे हे उंट विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.
सैगा रशिया आणि कझाकिस्तानमध्ये आढळणारी हरणाची ही प्रजाती पर्यायवरणीय बदलांमुळे लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.
सफेद बगळा भारतातील हिमालयीन क्षेत्रात आढळणारा हा बगळा आता लुप्त होण्याचा मार्गावर आहे.
रशियन स्टर्जन इराण, कझाकिस्तान आणि पूर्व युरोपच्या काही भागात आढळणारा हा मासा मोठ्या प्रमाणावर झालेल्या शिकारीमुळे विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे.
काळ्या छातीचे माकड माकडांची ही प्रजाती नष्ट झाल्याचे मानण्यात येत होते. मात्र 2002 मध्ये या प्रजातीची काही माकडे उत्तर व्हिएतनाममधील जंगलात आढळली होती. त्यानंतर या माकडांच्या संवर्धनाबाबत आशा वाढली आहे.