शी जिनपिंग यांची खुर्ची धोक्यात? भारतीय जवानांच्या शौर्याची झळ बिजिंगपर्यंत By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 05:24 PM 2020-07-05T17:24:33+5:30 2020-07-05T17:32:48+5:30
या वेळची मंदी खूप विचित्र कारणांनी ओढवलेली आहे. चीनचा विस्तारवादी स्वभाव याला कारण ठरला आहे. चीनला पश्चिमी देशांचाही विरोध होऊ लागला आहे. हे देश आधी चीनला मदत करत होते. गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेले अमेरिकेसोबतचे व्यापारयुद्ध आणि कोरोनामुळे चीनची अर्थव्य़वस्था ढासळण्याच्या मार्गावर आहे. यामुळे चीनचे नेतृत्व आपल्या सैन्याच्या जोरावर जगभरातील देशांवर पुन्हा व्यावसायिक पकड मिळविण्याचा प्रयत्न करत आहे.
गलवान घाटीमध्ये भारताने दिलेल्या चोख प्रत्युत्तरामुळे चीनचे राष्ट्रीध्यक्ष शी जिनपिंग यांच्या खुर्चीलाच जोरदार झटके जाणवू लागले आहेत. जाणकारांनुसार जिनपिंग यांची राजनैतिक आणि कूटनीतिक पकड आता ढीली होऊ लागली आहे.
जिनपिंग यांच्या नेतृत्वावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले असून त्यामध्ये भारतीय जवानांनी मारलेल्या चिनी सैन्याचा आकडा जाहीर न करणे हे देखिल कारण बनले आहे.
कम्युनिस्ट पार्टीवर जिनपिंग यांचे प्रभावी नियंत्रण राहिल्याचे सध्याच्या घडामोडींवरून दिसून येत नाहीय. यावेळी केवळ चीनचीच अर्थव्यवस्था खराब झालेली नसून राष्ट्राध्यक्षांच्या हातातूनही हळूहळू परिस्थिती निसटत चालली आहे.
2015-16 मधील मंदीमध्ये चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या छबीवर कोणताही परिणाम झाला न्वहता. मात्र, हा काळ त्यांच्यावर भारी पडू लागला आहे. तेव्हा जिनपिंग यांनी जास्त मेहनत न घेता इज्जत वाचविली होती.
या वेळची मंदी खूप विचित्र कारणांनी ओढवलेली आहे. चीनचा विस्तारवादी स्वभाय याला कारण ठरला आहे. चीनला पश्चिमी देशांचाही विरोध होऊ लागला आहे. हे देश आधी चीनला मदत करत होते.
कोरोनामुळे चीनला हे देश विरोध करू लागले आहेत. चीनचे लोकही शिक्षण किंवा पर्य़टनासाठी या देशांची यात्रा करत होते. मात्र, त्यांना आता चीनमध्येच रहावे लागणार आहे.
चीनचा महत्वाकांक्षी प्रकल्प बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (BRI) लाही जोरदार धक्का बसला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून चीन त्याचे राजकीय लक्ष्य गाठू इच्छित होता. चीनने खतरनाक कोरोना व्हायरसला लपविले आणि जगात त्याचा प्रसार केला, असा आरोप आता होत आहे. यामुळे हे देश BRIमध्ये कर्जाची पूनर्बांधणी करण्याची मागणी करू लागले आहेत.
जिनपिंग यांचा अनुभव दांडगा आहे. ते चीनच्या क्रांतीपासून कम्युनिस्ट पक्षाचे विश्वासून म्हणून मानले जात आहेत. त्यांनीच पक्षाची पुन्हा उभारणी केली. देशातील भ्रष्टाचाराविरोधातही त्यांनी क्रूर मोहिम सुरु केली होती. तसेच विरोधकांना कठीणातली कठीण शिक्षा केली.
याच आक्रमकतेने चीन आपल्या ताकदीचे प्रयोग शेजारी राष्ट्रांवर करू लागला आहे. भारताकडून एवढे चोख प्रत्युत्तर मिळेल अशी अपेक्षा केली नव्हती. परंतू भारतीय जवानांनी दाखविलेल्या शौर्याने चीनमध्ये त्सुनामी येणे बाकी राहिले आहे.
समुद्रामध्ये चीनची मनमानी आता भारी पडू लागली आहे. हाँगकाँगमध्ये लावण्यात आलेले प्रतिबंधही जिनपिंग यांच्या टीकेचे कारण बनले आहेत. यामुळे चीनमध्ये राष्ट्रवादाचा उन्माद एका काही काळासाठी फायद्याचा ठरू शकतो. परंतू जिनपिंग यांना सत्ताधारी बनून राहणे मोठे आव्हान ठरणार असल्याचे जाणकारांनी सांगितले.