पाण्यावर तरंगणा-या 'या' प्रसिद्ध बाजारात तुम्हीही करू शकता शॉपिंग! By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 04:21 PM 2018-10-03T16:21:07+5:30 2018-10-03T16:24:29+5:30
जगात असे काही देश आहेत ज्यातील लोक समुद्रात बोटीवर बसून भाजीपाला विकतात. इथे ग्राहकालाही नावेवरून भाजीपाला खरेदी करावा लागतो.
कोलकाता - कोलकात्यातील फ्लोटिंग मार्केट 100हून अधिक बोटींवर भरवलं जातं. इथे एका बोटीपासून दुस-या बोटीपर्यंत जाण्यासाठी लाकडाचा रस्ता तयार करण्यात आला आहे.
केरळ- Floating Triveni Super Store हे एका बोटीवर तयार करण्यात आलं आहे. ही बोट मॉल 50हून अधिक गावांमध्ये फिरते.
श्रीनगर - भारतातलं स्वर्ग असलेल्या जम्मू-काश्मीरमधल्या श्रीनगरमध्ये फ्लोटिंग मार्केट आहे. एका लेकवर वसलेलं हे फ्लोटिंग मार्केट पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्र आहे.
थायलंड- थायलंडमधलं फ्लोटिंग मार्केट जगभरात प्रसिद्ध आहे.
व्हिएतनाम- इथे दोन ठिकाणी फ्लोटिंग मार्केट अस्तित्वात आहेत. फुंग हेप आणि काई बी इथे ही दोन्ही मार्केट वसलेली आहेत.