सामुराई तलवार 'कटाना'संबंधी १० खास गोष्टी, तयार करण्याची पद्धत वाचाल तर अवाक् व्हाल By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 02:02 PM 2022-02-04T14:02:02+5:30 2022-02-04T14:08:21+5:30
Samurai Katana Sword : एक पारंपारिक तलवार - सामुराई ज्या तलवारीचा सर्वात जास्त वापर करत होते ती होती कटाना. ही तलवार पारंपारिक पद्धतीने तयार केली जात होती. इतिहासातील महान योद्धांमध्ये सामुराईला स्थान आहे. हा जपानी सैनिकांचा एक खास वर्ग होता. ज्यांना तलवारबाजीत महारथ होती. विजेच्या वेगाने तलवार चालवणारे सामुराई दुश्मनांचा खात्मा मिनिटांमध्ये करत होते. असं मानलं जातं की, १२व्या शतकात हे मोठी ताकद म्हणून समोर आले आणि बरेच वर्ष आपला दबदबा त्यांनी ठेवला. सामुराई काही निवडक तलवारींचा वापर करत होते. ज्यात कटाना सर्वात वरच्या स्तराची तलवार होती.
एक पारंपारिक तलवार - सामुराई ज्या तलवारीचा सर्वात जास्त वापर करत होते ती होती कटाना. ही तलवार पारंपारिक पद्धतीने तयार केली जात होती. आजही लायसन्स असलेले तलवार तयार करणारे लोक कटाना तलवार तयार करतात.
काय आहे कटानाचं महत्व - आधी सरळ ब्लेड असलेल्या तलवारींचा वापर केला जात होता. ज्या चीन आणि कोरियाहून आयात केल्या जात होत्या. कर्व्ड म्हणजे थोडी घुमावदार ब्लेड असलेली तलवारीची सुरूवात तेव्हा झाली जेव्हा सामुराई घोड्यावर बसून लढाई लढू लागले होते.
कटाना केवळ एक तलवार नाहीये तर सामुराईसोबत एकदम खोलवर जुळलेली असते. एक काळ असाही होता की, कटाना वापरण्याचा अधिकार केवळ सामुराईंनाच होता. जर दुसऱ्या सैनिकांनी ही तलवार वापरली तर त्यांना शिक्षा दिली जात होती.
या तलवारीचा वापर अनेक वर्षांपासून केला जातो. राजे-महाराज्यांचे आपले तलवार तयार करण्याचे कारखाने होते. पण कटानाचं निर्माण फार वेगळं होतं. ही तलवार तयार करताना रितीरिवाजांचं पालन करावं लागत होतं. ही तयार करणाऱ्याला आपलं शुद्धीकरण करावं लागत होतं. शुद्धीकरण करण्यासाठी उपवास, संभोग क्रियेपासून दूर राहणं आणि मंदिरात जाणं यांचा समावेश होता.
असं मानलं जातं की, तलवार तयार करण्यात येणाऱ्या ठिकाणाला पवित्र दोरीने घेरलं जात होतं. तलवार तयार करणाऱ्या व्यक्तीला धबधब्याखाली आंघोळ करत मंत्र म्हणावे लागत होते.
तलवारीचा महत्वाचा भाग तिचं ब्लेड असायचं आणि त्याचंच अधिक मूल्य होतं. पण कटानासोबत असं नव्हतं. कटानाच्या ब्लेडसोबतच तिचे इतरही भाग जसे की, हॅंड गार्ड आणि स्कॅबर्ड्स म्हणजे म्यानही महत्वाचे होते. अनेकदा कटानाचं हॅंडगार्ड अशाप्रकारे सजवलं जात होतं की त्याची किंमतही ब्लेड इतकीच असायची.
कटानाला खास बनवण्यासाठी योग्य पॉलिश प्रक्रियेतून जावं लागत होतं. या कामात वेगवेगळ्या वस्तूंचा वापर केला जात होता. ज्यात खास दगडाचाही समावेश होता.
कटाना तयार झाल्यावर टेस्टिंग होत होती. वाचून आश्चर्य वाटेल की, ही मनुष्याच्या मांसावर आणि हाडांवर वार करून टेस्ट केली जात होती. गुन्हेगारांच्या मृत शरीरावर ती टेस्ट केली जात होती.
असं मानलं जातं की, गुणवत्तेच्या बाबतीच १५३० च्या आधी जी कटाना तलवार तयार केली जात होती ती योग्य कटाना मानली जात होती. यामागे मुख्य कारण आधुनिक हत्यार समोर येणं आहे.
आधुनिक तलवार आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये इंटरेस्ट यामुळे पारंपारिक तलवार बनवण्याची कला हळूहळू गायब होत आहे. जपान फार कमी लोक राहिलेत जे पारंपारिक आणि रितीरिवाजाने तलवार तयार करतात.