भारीच! १२५ वर्षांच्या स्वामी शिवानंदांनी सांगितलं दीर्घायुष्याचं सिक्रेट; या वयातही २ गोष्टींमुळे तब्येत ठणठणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 11:51 AM2021-03-14T11:51:53+5:302021-03-14T13:07:02+5:30

125 year old swami shivanand is fit in this age know the secret : पासपोर्ट आणि आधारकार्डवरील माहितीनुसार ८ ऑगस्ट १८९६ मध्ये त्यांचा जन्म झाला होता. म्हणजेच आता यांचे वय १२५ वर्ष आहे. यावयात सुद्धा अगदी ठणठणीत आहेत.

वाराणसीतील स्वामी शिवानंद याचे वय १२५ वय आहे. विशेष म्हणजे या वयातही ते एकदम निरोगी आणि ठणठणीत आहेत. स्वामी शिवानंद आपल्या शिष्यांसह १० दिवसांच्या प्रवासासाठी गोरखपूर मंदिरात गेले होते. आपल्या दीर्घायुष्याचं सिक्रेट सांगताना स्वामी शिवानंद यांनी सांगितले की, 'नो ऑईल, ओनली ब्‍वॉएल'. 'गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड रिकॉर्डमध्ये वयस्कर व्यक्तीच्या यादीत स्वामी शिवानंद यांचा समावेश करावा यासाठी विद्यार्थ्यांनी निवेदन दिलं आहे.

स्वामी शिवानंद यांच्यासह कोलकात्यामधील गोरखपूरच्या आरोग्य मंदिरात प्रवासाला निघालेले त्यांचे शिष्य आसिम कृष्ण यांनी दिलेल्या माहितीनुसार वाराणसीतील दुर्गापुरीचे रहिवासी असलेले स्वामी शिवानंद बाल ब्रम्हचारी आहेत. त्यांनी कोणतंही शालेय शिक्षणं घेतलेले नाही. पण स्वअध्ययनातून योगा आणि आध्यात्माशी त्यांचा संबंध आला. त्यांना इंग्रजी, हिंदी, बांग्ला या तीन भाषा येतात.

पासपोर्ट आणि आधारकार्डवरील माहितीनुसार ८ ऑगस्ट १८९६ मध्ये त्यांचा जन्म झाला होता. म्हणजेच आता यांचे वय १२५ वर्ष आहे. यावयात सुद्धा अगदी ठणठणीत आहेत. आपल्या निरोगी असण्याबाबत सांगताना स्वामी इंद्रियांवर नियंत्रण, साधं जेवण, व्यायाम, योगा आणि संतुलित दिनक्रमाचा उल्लेख करतात.

'मिजाज कूल लाईफ ब्यूटीफूल' आणि 'नो ऑईल ओन्ली बॉईल' हे स्वामी शिवानंदांचे मुलमंत्र आहेत. स्वामी शिवानंद रोज सकाळी ३ वाजता उठतात. नित्य क्रिया, जप, ध्यान- व्यायामानंतर नाष्त्याला लाह्या-चूरा, दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात दाळ, रोटी आणि उकळलेल्या भाज्यांचा समावेश असतो. ते रात्री ८ वाजता झोपतात. सामाजिक कार्यांचीही त्यांना आवड आहे. तसंच अणवानी पायांनी जास्तीत जास्त चालण्याचा प्रयत्न करतात.

स्वामी शिवानंद यांचा जन्म सिल्लगट्ट जिल्ह्यात म्हणजेच सध्याच्या बांग्लादेशातील हबीबगंज जिल्ह्यातील हरिपूर गावात भगवती देवी आणि श्रीनाथ ठाकूर यांच्या घरी झाला होता.

आर्थिक परिस्थितीत बिकट असल्यामुळे त्यांच्या आई वडिलांनी त्यांना वयाच्या चौथ्या वर्षी ओंकारनंद गोस्वामींना दान केलं होतं. स्वामी शिवानंद जेव्हा ६ वर्षाचे होते तेव्हा त्यांची आई वडिल आणि बहिणीचे निधन झाले होते. बाबा ओंकारनंद यांच्या सानिध्यात त्यांनी वैदिक ज्ञान मिळवलं आणि वयाच्या १६ व्या वर्षी ते पश्चिम बंगालला आले.

स्वामी शिवानंद यांनी शिष्यांच्या आग्रहाखातर इंग्लँड, ग्रीस, फ्रांस, स्पेन, ऑस्ट्रिया, इटली, हंगरी, रूस, पोलंड, आयरलँड, नीदरलँड, स्विट्जरलँड, जर्मनी, बुल्गेरिया, युकेसह ५० देशांचे भ्रमण केले आहे.