15 inventions we have been waiting on forever
'या' १४ भन्नाट वस्तूंच्या शोधाने जगणं होईल सोपं, पण खरंच यांची गरज आहे का? By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 03:46 PM2019-12-04T15:46:55+5:302019-12-04T16:03:57+5:30Join usJoin usNext जगभरात सतत वेगवेगळ्या विचित्र वस्तूंची आविष्कार होत राहतात. पण तरीही आपल्याला रोजच्या जगण्यात काहीना काही अडचणी येत राहतात. पण अलिकडे अशाही काही वस्तू तयार करण्यात आल्या आहेत की, ज्यांमुळे लोकांचं जगणं आणखी सोपं झालं आहे. १) Finger-Stylus - स्मार्टफोन यूजर्ससाठी हे फायदेशीर आहे. याचा वापर करून सहजपणे फोन एकाच हाताने ऑपरेट करता येईल. २) सुटकेस - स्कूटर - सुटकेसला चाकं असतात हे तुम्हाला माहीत आहेच. पण लोकांची डिमांडही वाढत आहे. त्यानुसार सुटकेस स्कूटरही आल्या आहेत. ३) फूड अॅलर्जी चेकर - हे मशीन वापराल तर काहीही खाण्याचा विचार करण्याऐवजी बस चेक करावं लागेल. ४) घोरणं बंद करणारी मशीन - ज्या लोकांना घोरण्याची समस्या असते त्यांच्यासाठी ही मशीन चांगली आहे. याने त्यांच्या बाजूचे लोक शांतपणे झोपू शकतील. ५) Virtual Keyboard Projector - हे की-बोर्ड प्रोजेक्टर तुमचं काम सोपं करणारं आहे. याचा वापर तुम्ही कोणत्याही डिवाइससोबत करू शकता. ६) पिझ्झा ओव्हन - या पिझ्झा ओव्हनमध्ये तुम्ही केवळ ६ मिनिटांमध्ये पिझ्झा तयार करू शकता. याची खासियत म्हणजे यात २ बेकिंग स्टोन लावलेले आहेत. जे आगीपासून गरमी घेऊन समान वितरीत करते. ७) एका बॉक्समध्ये एकट्याचा टीव्ही - HBO बॉक्सच्या माध्यमातून तुम्ही एकटे निवांतपणे टीव्ही बघू शकता. ८) फ्लूअल कंट्रोल करणारं डिवाइस - GoFar हे डिवाइस ड्रायव्हर्सना रिअल टाइम फीडबॅक देतं. ९) Portable Washing Machine - हे एक पोर्टेबल गॅजेट असून कोणत्याही सिंकला मोबाइल वॉशिंग मशीनमध्ये बदलू शकतं. हे गॅजेट अल्ट्रासाउंड तरंगांचा वापर करतं. जेव्हा याला सिंकसोबत जोडलं जातं तेव्हा यातून अल्ट्रासोनिक साउंडवेव्हचं उत्सर्जन होतं आणि याने कपडे स्वच्छ करण्यात मदत मिळते. १०) मूड बदलणारा बॅकपॅक - या बॅकपॅकने महागड्या वस्तूंची सुरक्षा तर होतेच. सोबतच इतर लोकांच्या तुलनेत याने तुमचा मूडही अॅडजस्ट केला जाऊ शकतो. ११) कुत्र्यांसाठी पॉ क्लीनर - कुत्र्यांची आवड असणाऱ्यांच्या घरात हे क्लीनर असणं गरजेचं आहे. १२) डिशवॉशर - हे डिशवॉशर स्पिनिंग ब्रशच्या मदतीने हात न लावताच तुमची भांडी स्वच्छ करून देतं. १३) हॉट टब सोलर डोम - गरम पाण्यात बसून थंडीचा आनंद घ्यायचा असेल तर हा हॉट टब सोलर डोम तुमची मदत करू शकतो. १४) Illuminated Toilet Bowl - या टॉयलेटमध्ये तुम्हाला लाइट ऑन करण्याची गरज नाही. यात मोशन लाइट सेन्सर लावण्यात आले आहेत. त्यात वेगवेगळ्या रंगाचा प्रकाश पडतो.टॅग्स :जरा हटकेइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeInteresting Facts