400 वर्ष जुना आणि 400 खोल्या असलेला असा महाल ज्याचा केवळ एका रात्रीसाठी वापर झाला, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 15:25 IST2025-03-22T14:33:38+5:302025-03-22T15:25:42+5:30
Datia Palace : राजे-महाराजांच्या अनेक पिढ्या या किल्ल्यांमध्ये राहत आहेत. मात्र, भारतात एक असा महाल आहे ज्याचा वापर केवळ एका रात्रीसाठी करण्यात आला होता.

Datia Palace : भारताला जगभरात किल्ले-महालांचा देश अशी ओळख आहे. भारताचा इतिहासही जगभरात चर्चेचा विषय ठरत असतो. देशात अनेक किल्ले आणि महाल आधीच्या राजे-महाराजांनी बांधले आहेत. त्यातील काही किल्ले किंवा महाल चांगल्या स्थितीत उभे आहेत. राजे-महाराजांच्या अनेक पिढ्या या किल्ल्यांमध्ये राहत आहेत. मात्र, भारतात एक असा महाल आहे ज्याचा वापर केवळ एका रात्रीसाठी करण्यात आला होता.
मध्य प्रदेशमध्ये हा महाल गेल्या 400 वर्षापासून ठामपणे उभा आहे. ग्वाल्हेरवर सिंधिया यांचं राज्य येण्यापूर्वी हा भाग मुघल साम्राज्यात होता. हळूहळू मुघल त्यांच्या राज्याचा विस्तार करत होते. इतिहासानुसार, अकबर म्हातारा होत होता आणि त्याचं मुलगा सलीमसोबत अजिबात पटत नव्हतं. वाद चांगलाच पेटला होता. सलीम अकबराविरोधात बंड पुकारलं आणि एका कोर्टाची स्थापना केली. मुलगा सलीमला मनवण्यासाठी अकबरानं आपला प्रधानमंत्री अबुल फजलला पाठवलं.
यातही ट्विस्ट असा आहे की, असं म्हटलं जातं की, अबुल फजलची इच्छा होती की, सलीमनं राजगादीवर बसू नये. या संधीचा फायदा घेत तो सलीमची हत्या करणार होता. अबुल फजल इलाहाबादला येणार असल्याचं सलीमला समजलं. येणाऱ्या स्थितीचा सामना करण्यासाठी सलीम स्वत:ला मजबूत करण्याच्या तयारीला लागला. तेव्हाच बीर सिंह देव त्याच्याकडे अकबराच्या वजीराला म्हणजेच अबुल फजलला मारण्याचा प्रस्ताव घेऊन आले.
बीर सिंह देव त्यावेळी केवळ एक जमीनदार होता. त्यालाही सलीमप्रमाणे बादशाह अकबरच्या नीति पसंत नव्हत्या. असंही सांगितलं जातं की, सलीम स्वत: त्याच्याकडे मदत मागण्यासाठी गेला होता. बीर सिंह देवने हे मिशन सुरूच ठेवलं आणि अबुल फजलचा खात्मा केला. अबुलचं कापलेलं शिर तो सलीमसमोर घेऊन गेला.
या घटनेनंतर बीर सिंह देव सलीमच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक झाला होता. पण अकबरला कोणत्याही स्थितीत बीर सिंह देवला ताब्यात घ्यायचं होतं. बीर सिंहने देव आयुष्यातील अनेक वर्ष सलीमला अकबराच्या सैनिकांपासून वाचवण्यात घालवले.
अशातच अकबरचा मृत्यू झाला. तोपर्यंत सलीमने वडिलांसोबतचा वाद मिटवला होता आणि त्यांच्या निधनानंतर तो लगेच युवराजचा राजा बनला होता. सलीमने त्याचं नाव बदलून जहांगीर ठेवलं होतं. राजा बनताच त्याने बीर सिंह देवला ओरछाच्या गादीवर बसवलं. काही वर्षांनी सलीम जुन्या मित्राला भेटण्यासाठी जाणार होता. अशात त्याने आपल्या राज्यात ५२ इमारती तयार करण्याचा आदेश दिला. यातील एक जागा होती दतिया. हा महाल त्याने बीर सिंह देव याला भेट म्हणून दिला होता.
दतिया महालाला बीर सिंह देव महाल आणि सतखंडा महाल नावानेही ओळखलं जात. प्लाननुसार बादशाह सलीम या महालात आला आणि ओरछाला जाण्याआधी त्याने या महालात एक रात्र घालवली. हा महाल भेटवस्तू असल्याने ना बीर सिंह देव आणि ना त्याच्या परिवाराने कधी याचा वापर केला. हेच कारण आहे की ४०० वर्षापासून दतिया महाल तसाच आहे. त्याचा आजपर्यंत कुणी वापर केला नाही.