5 perfect destinations for pre wedding photoshoot in india
प्रीवेडिंग फोटोशूट करायचंय? मग या लोकेशन्सचा नक्की विचार करा By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 08:34 PM2018-07-18T20:34:33+5:302018-07-18T20:41:38+5:30Join usJoin usNext राजस्थान: भव्यदिव्य महाल आणि वाळवंट यांच्यामुळे राजस्थान प्रीवेडिंग फोटोशूटसाठी परफेक्ट लोकेशन आहे. बिकानेर, जैसलमेर, जयपूर, जोधपूर, उदयपूर या ठिकाणांची निवड तुम्ही फोटोशूटसाठी करु शकता. पंजाब: पंजाबचं उल्लेख करताच दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे चित्रपटात दाखवण्यात आलेल्या 'सरसों की खेती' डोळ्यासमोर येते. बॉलिवूडचं आवडतं लोकेशन असलेल्या पंजाबमध्ये उत्तम प्रीवेडिंग फोटोशूट करता येऊ शकतं. काश्मीर: खरंतर काश्मीर हे हनिमूनसाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. मात्र या ठिकाणी उत्तम प्रीवेडिंग फोटोशूट होऊ शकतं. निसर्ग सौंदर्याचं वरदान लाभलेल्या काश्मीरमध्ये सुंदर फोटोशूट होऊ शकतं. बंगळुरू: आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरुतही छान फोटोशूट केलं जाऊ शकतं. रोमँटिक फोटोशूट करायचं असल्यास बंगळुरुचा पर्याय उत्तम ठरु शकतो. दिल्ली: देशाच्या राजधानीत अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. त्यामुळे दिल्लीत फोटोशूट करण्यासाठी खूप पर्याय उपलब्ध आहेत. लालकिल्ला, इंडिया गेट, लोटस टेम्पल, चांदनी चौक याठिकाणी सुंदर फोटो काढता येऊ शकतात. टॅग्स :जरा हटकेJara hatke