50 year old grandma ready to marry 22 year tinder match often mistaken as mother son
बोंबला! घटस्फोटानंतर ५५ वर्षांची महिला २२ वर्षांच्या मुलाच्या मागे लागली, अन् आता म्हणते लग्न करणार ... By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 06:04 PM2021-01-20T18:04:40+5:302021-01-20T18:28:39+5:30Join usJoin usNext सध्याच्या काळात बरेच सिंगल लोक डेटिंग एप्सचा वापर करतात. अनेकांना या डेटिंग एप्सच्या माध्यमातून हवातसा जोडीदार मिळतो. बरेच लोक एकटेपणाचा सामना करत असताना सोशल मीडियावर पार्टनर शोधतात. नॉर्थ कैरोलिनामधील ५० वर्षीय शेरोन हॉकिंस नावाची महिला घटस्फोट झाल्यानंतर खूप एकटी पडली होती. त्यानंतर तिनं टिंडर अॅप डाऊनलोड केले. यावर त्यांनी १९ वर्षापर्यंतच्या मुलांची वयोमर्यादा निवडली. त्यानंतर २२ वर्षाच्या पॅरी हॉप्सीनसह या महिलेची जोडी जमली. दोघांनी बराचवेळ एकमेंकांना डेट केल्यानंतर आता दोघे लग्न करण्याच्या तयारीत आहेत. या वर्षाच्या शेवटापर्यंत लग्न करण्याचा विचार या दोघांनीही केला आहे. वयातील फरकामुळे या दोघांनाही लोकांकडून बरीच बोलणी ऐकावी लागत आहेत. सोशल मीडियावर ५० वर्षीय शेरोने आपली लव्हस्टोरी शेअर केली आहे. आजी बनलेल्या शेरोनने घटस्फोटानंतर एकटेपणा घालवण्यासाठी मोबाईलमध्ये टिंडर अॅप इन्स्टॉल केले आणि आपल्याला हव्या तश्या जोडीदाराला भेटली. टिंडरवर शेरोनला २२ वर्षांच्या पॅरीशी प्रेम झाले. पॅरी मर्चेंट नेव्हीमध्ये कामाला आहे. शेरोन एका शाळेत शिक्षिका आहे.या दोघांमध्ये २८ वर्षांचे अंतर आहे. प्रेमाला कशाचंही बंधन नसतं. हे या दोघांनी दाखवून दिले आहे. ही दोघंजणं जेव्हा बाहेर जातात तेव्हा जास्तीत जास्त लोक त्यांना आई- लेक असल्याचे समजतात. शेरोनने दिलेल्या माहितीनुसार तिला या गोष्टीचे काहीही वाटत नाही. शेरोनचे वय पॅरीच्या आई एव्हढे आहे. दोघांचेही एकमेकांवर प्रेम असल्यामुळे लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन नातवांची आजी असलेल्या शेरोननं घटस्फोट झाल्यानंतर २०२० मध्ये आपल्या फोनमध्ये टिंडर डाऊनलोड केले. या एॅपमध्ये मुलांची वयोमर्यादा १९ निवडण्यात आली होती. यामुळेच शेरोनची भेट पॅरीशी झाली. शेरोनने सांगितले की, ''जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा मला जाणवलं की, कमी वयाच्या मुलांमध्ये जास्त रस आहे. मी नेहमी लपून लपून कमी वयाच्या मुलांना पाहायची. त्यानंतर २०१५ मध्ये माझा घटस्फोट झाला.'' ''घटस्फोटानंतर काही काळ मला खूप एकटं वाटत होतं. नंतर मी माझ्या नातवंडांसह वेळ घालवयाला सुरूवात केली. २०२० मध्ये मला पार्टनरची गरज असल्याचे जाणवले त्यानंतर मी टिंडरवर अकाऊंट उघडले. पॅरीला भेटल्यानंतर वयाबद्दल सांगितले तेव्हा त्याचा विश्वास बसला नाही. त्याला मी ३० वर्षांची असेन असं वाटलं.'' जेव्हा त्याला शेरॉनच्या वयाबद्दल कळलं तेव्हा तो हैराण झाला. टॅग्स :जरा हटकेलग्नJara hatkemarriage