पशु-पक्ष्यांसारखी दिसणारी ही अफलातून फुलं पाहिलीत का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 07:38 PM2018-11-05T19:38:59+5:302018-11-05T19:42:32+5:30

जगभरामध्ये अनेक वास्तू किंवा गोष्टी अशा आहेत ज्या पाहिल्यावर आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. ज्या आपल्या कल्पनाविश्वाच्या पलिकडे असतात. आज आम्ही तुम्हाला अशा फुलांबाबत सांगणार आहोत. जी पाहिल्यावर तुम्ही विचारात पडाल की हे नक्की काय आहे? ही फूलं आहेत आर्किडची. यामध्ये अनेक वेगवेगळे प्रकार आढळतात. आता तुम्ही विचारात पडला असाल की, बहुतेक सर्वच फुलांचे वेगवेगळे प्रकार आढळतात. पण ऑर्किडचे प्रकार इतर फुलांपेक्षा वेगळे असतात. कारण ही फुलं वेगवेगळ्या पक्षी, प्राणी आणि किटकांप्रमाणे दिसतात. जाणून घेऊयात सहा अशा हटके ऑर्किडच्या प्रकारांबाबत...

फ्लाइंग डक ऑर्किड (Flying Duck Orchid) ही फुलं बदकाप्रमाणे दिसतात. ही फुलं ऑस्ट्रेलियामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.

बी ऑर्किड (Bee Orchid) हे मधमाशीप्रमाणे दिसतात. ही फुलं इग्लंड, आयर्लन्ड आणि वेसल्समध्ये आढळून येतात.

मंकी फेस आर्किड (Monkey Face Orchid) हे फुल पाहिल्यावर तुम्ही गोंधळून जाल. या फुल चक्क माकडाच्या चेहऱ्याप्रमाणे दिसतं. ही फुलं इक्वेडोर आणि पेरू या ठिकाणी आढळून येतात.

मॉथ आर्किड (Moth Orchid) दिसायला एका किटकाप्रमाणे दिसतं. दक्षिण आशियामध्ये ही फुलं आढळतात.

डव्ह ऑर्किड (Dove Orchid or Holy Ghost Orchid) ही फुलं एखाद्या कबुतराप्रमाणे दिसतात. याचा रंग पांढराशुभ्र असतो. हे फुल पनामामध्ये आडळून येतं. हे पनामाचे राष्ट्रीय फुल आहे.

वाईट इग्रेट ऑर्किड (White Egret Orchid) हे फुल वाइट इग्रेटप्रमाणे दिसते. हे फुल चीन, जापान, कोरिया आणि रूसमध्ये आढळून येते.