The 600-year-old bridge made of grass
गवतापासून बनलेला 600 वर्षांपूर्वीचा पूल By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 05:07 PM2019-07-04T17:07:16+5:302019-07-04T17:18:16+5:30Join usJoin usNext गवतापासून बनलेल्या या पूलास इंका रोप ब्रीज असे म्हटले जाते. कारण, इंका साम्राज्यात पूल बांधण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला जात होता. येथील परंपरेनुसार केवळ पुरुषांनाच हा पूल बनविण्याचा अधिकार होता. महिला केवळ नदीकिनारी बसून लहान-लहान दोऱ्या बनवित. जाड दोरखंडाचा वापर करुन हवेत लटकणाऱ्या या पुलास हातांनीच गुंफले जाते. विशेष म्हणजे गेल्या 600 वर्षांपासून हा पूल लोकांच्या वाहतूकीचे साधन बनला आहे. युनेस्कोने 2013 मध्ये यास जागतिक मान्यतेच्या रुपात घोषित केले आहे. या पुलाच्या बांधणीवरुन नवीन पुलांची निर्मित्ती करण्यात येत आहे. पूलबांधणीचा हा दोरखंड बनविण्याची पद्धतही जबरदस्त आहे. पुलाच्या दोन्ही बाजुंचे पुरुष कारागिर एकत्र येऊन गवतापासून हा दोरखंड बनवतात. पूल बनिवण्याच्या पहिल्याच दिवशी कामावर येणारे पुरुष लहान दोऱ्यांच्या सहाय्याने मोठा दोरखंड बनवित. प्रमुक पूल हा 6 मोठ्या दोरखंडांपासून बनविला जातो. हा पूल बनिवण्यासाठी कोया इचू नामक विशिष्ट वनस्पतीचे गवत वापरण्यात येते. त्यास अगोदर दगडांनी ठेचून आणि नंतर पाण्यात भिजवून घेतले जाते. आपण, त्यास काथ्या असंही म्हणतो. विशेष म्हणजे हा पूल बनिवण्यासाठी कुठल्याही आधुनिक यंत्रसामुग्राची किंवा मशिनचा वापर करण्यात आला नाही. टॅग्स :जरा हटकेJara hatke