7 things employees of Google, Microsoft, Amazon are 'banned' from doing at work
गुगल, मायक्रोसॉफ्टच्या ऑफिसमधले 'हे' अजब नियम माहितीयेत का? By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 02:37 PM2020-01-21T14:37:28+5:302020-01-21T14:46:34+5:30Join usJoin usNext गुगल, फेसबुक, मायक्रोसॉफ्टसारख्या मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना चांगल्या पगाराचं पॅकेज देतात. कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने वेगवेगळ्या सुविधा या त्यांना ऑफिसमध्ये देण्यात येतात. मात्र या कंपन्यांमध्ये काही अजब नियम आहेत. ते जाणून घेऊया. अॅमेझॉन अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांनी एका मुलाखतीत अॅमेझॉनमध्ये पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन करण्यास मनाई असल्याचं सांगितलं. मायक्रोसॉफ्ट मायक्रोसॉफ्टमध्ये कर्मचाऱ्यांना काम करत असताना शब्द, व्याकरण तपासणाऱ्या अॅपचा वापर करण्यास बंदी आहे.गुगल गुगलमध्ये कामाव्यतिरिक्त गोष्टींवर चर्चा करण्यास मनाई आहे. कर्मचारी काम करण्यासाठी ऑफिसमध्ये येत असल्याने हा नियम लागू केला आहे. आयबीएम आयबीएम कंपनीमध्ये एसडी कार्ड, पेन ड्राइव्ह वापरण्यास बंदी आहे. 2018 मध्ये आयबीएमने याची माहिती दिली होती.उबर उबरच्या सीईओंनी उबरमध्ये टेलिग्राम अॅप वापरण्यास मनाई असल्याची माहिती दिली होती.टेस्ला टेस्ला कंपनीने कर्मचाऱ्यांना ब्लाइंड अॅप वापरण्यास बंदी घातली आहे. अॅपच्या माध्यमातून कर्मचारी कंपनीबाबत चर्चा करत असल्यामुळे ही बंदी घालण्यात आली.मायक्रोसॉफ्ट मायक्रोसॉफ्टमध्ये गुगल डॉक्स वापरण्याला बंदी आहे, खरंतर थेट बंदी नाही मात्र हे वापरल्यास त्याबाबतच व्यावसायिक कारण देऊन स्पष्टीकरण द्यावं लागतं.टॅग्स :गुगलअॅमेझॉनgoogleamazon