A village in Afghanistan has become to be known as the ‘one kidney village’
‘या’ गावातील बहुतांश लोकांची एक किडनी गायब; खरं कारण ऐकून बसेल जबर धक्का By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 04:04 PM2022-03-17T16:04:28+5:302022-03-17T16:08:15+5:30Join usJoin usNext मानवी शरीरात २ किडनी असतात. यातील जर १ किडनी काढली तरी माणूस जिवंत राहू शकतो. अनेकदा किडनी खराब झाल्यानंतर डॉक्टरांकडून ऑपरेशन करून ती काढली जाते. काहीवेळा दोन्ही किडनी खराब झाल्यानंतर एखाद्या डोनरकडून किडनी घेऊन रुग्णाचा जीव वाचवला जातो. परंतु आज आम्ही तुम्हाला जे सांगणार आहोत कदाचित या बातमीवर विश्वास ठेवणं तुम्हाला कठीण जाईल. पण ही खरी घटना आहे. अफगाणिस्तानातील एक असं गाव आहे ज्या गावातील प्रकार ऐकून तुम्ही हैराण व्हाल. याठिकाणी बहुतांश लोकांच्या शरीरातील १ किडनी गायब आहे. म्हणजे या गावातील गावकऱ्यांच्या पोटात २ ऐवजी केवळ १ किडनी आहे. आणि त्याच्याच आधारे हे लोकं जीवन जगत आहेत. गावात १,२ नव्हे तर शेकडो लोकं तुम्हाला १ किडनी असलेले सापडतील. Agence France Presse च्या नुसार, अफगाणिस्तानात हेरात (Herat City) शहराजवळ हे गाव वसलेले आहे. या गावाचं नाव शेनशायबा बाजार असं आहे. संपूर्ण जगात हे एक किडनीवालं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. आता तुम्ही विचार करत असाल हा शारिरीक आजार तर नाही? तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. वास्तविक या गावातील लोकं एक किडनी विकण्यासाठी मजबूर आहेत. २ वेळचं जेवायला अन्न मिळत नसल्याने गावातील लोकांवर ही वाईट वेळ आली आहे. ज्यामुळे ते एक किडनी विकून पोट भरतात. अफगाणिस्तानात या गावातील लोकांना गरिबीला इतकं वाईटरित्या सामोरं जावं लागत आहे. ज्यामुळे पोट भरण्यासाठी त्यांना किडनी विकावी लागत आहे. तालिबान सरकार आल्यापासून या गावची परिस्थिती आणखी बिकट झाली. याठिकाणी गावकऱ्यांना एकवेळचं अन्न मिळणं मुश्किल झालं. आपल्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्यानं घरातील प्रत्येक जण किडनी विकून जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या शरीरातील एक किडनी विकून याठिकाणी गावकरी त्यांच्या कुटुंबाला पोट भरण्यासाठी अन्न देत आहेत. याठिकाणी लोकांच्या माध्यमातून ब्लॅक मार्केटिंग करून किडनी विकणं ही खूप सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. गावातील शेकडो कुटुंबावर ही दुर्दैवी वेळ आलीय. गावातील बहुतांश पुरुष आणि महिलांनी त्यांची एक किडनी पोटासाठी विकली आहे. याठिकाणी किडनी विकून गावकऱ्यांना जवळपास २ लाख रूपये मिळतात. अफगाणी मुद्रेप्रमाणे त्याचे मूल्य तब्बल २ लाख ५० हजार इतके आहे. टॅग्स :अफगाणिस्तानAfghanistan