आया रे राजा लोगो रे लोगो...! सिंहाचा 'हा' फोटो होतोय भलताच व्हायरल, पाहुन उडेल थरकाप By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 03:13 PM 2021-07-21T15:13:13+5:30 2021-07-21T15:25:46+5:30
आया है राजा लोगो रे लोगो...शेर को शेर हुँ मे यारो...हे गाणे गायले जाते ते खास जंगलाच्या राजासाठी. त्याच्या एका डरकाळीने सगळे गारद होतात. पण मित्रांनो या जंगलाच्या राज्याचा म्हणजेच सिंहाचा एक असा फोटो आहे जो पाहुन तुम्ही थरथर कापायला लागाल....कोणी काढला आहे का फोटो? जंगलाच्या राजाला पाहण्यासाठी काही जण खास जंगल सफारीचा आनंद घ्यायला जातात. पण सिंह डरकाळी फोडून समोर येताच सर्वांची भंबेरी उडते.
असाच एक सिंहाचा थरकाप उडवणारा फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल होतोय.
हा फोटो काढला आहे ब्रिटनच्या साईमन नीधम या फोटोग्राफरने. या फोटोमुळे सध्या ते प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात आले आहेत.
हा फोटो दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथील जीजी कंजर्वेशन वाईल्डलाईफमध्ये काढण्यात आलेला आहे.
आपण पाहु शकता यात सिंह हाडांच्या ढिगाऱ्यावर अगदी ऐटीत उभा आहे.
या फोटोला पाहुन सिंह हे किती हिंस्त्र श्वापद आहे याची आपल्याला पूरेपूर कल्पना येते.
हा फोटो नीधम यांनी काढला तेव्हा सिंह त्यांच्यापासून फक्त ३० फुटाच्या अंतरावर होता.
ते म्हणतात, मी सकाळीच तेथे जाण्याचे निश्चित केले. मी खुप लकी होतो की तेव्हा हा जंगालाचा राज डोंगराच्या टोकावर उभा होता.
ते पुढे म्हणतात, की तो फक्त एक ते दोन मिनिटं तेथे होता. तेवढ्यात मी त्याचे फोटो काढले.
नीधम यांच्या फोटोचे नेटिझन्सकडून फार कौतूक होत आहे. अनेकजण त्यांच्या धैर्याचीही वाहवा करत आहेत.