बापरे! एक किलो चहाची किंमत 70,501 रुपये...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 03:54 PM2019-08-01T15:54:49+5:302019-08-01T16:02:11+5:30

आसाम येथील एका चहाच्या मळ्यात 70,501 रुपये प्रतिकिलो दराने चहा विकला गेला. आतापर्यंतच्या चहाच्या दराचा हा विक्रम आहे.

31 जुलै रोजी चहाचा लिलावत करण्यात आला. यावेळी आसामचा गोल्डन टिप्स या चहाला सर्वाधिक जास्त बोली लागली.

या लिलावाच्या आदल्या आसामचाच मनोहारी टी जगातील सर्वात मौल्यवान चहा ठरला होता. या चहावर 50000 रुपये प्रतिकिलो एवढी बोली लागली होती. गोल्डन टिप्सने या चहाचे रेकॉर्ड मोडले.

गोल्डन टिप्स चहा नावाप्रमाणे सोनेरी रंगाच्या पानांचा आहे. ब्रिटिशांनी सुरू केलेल्या सर्वांत जुन्या चहाच्या मळ्यांपैकी एक असणाऱ्या मजियान मळ्यातला हा चहा आहे.

तसेच, गोल्डन टिप्स चहाची पाने हाताने खुडलेली असतात आणि त्याचे ब्र्युइंग खास पद्धतीने होते.

चहाची रोपे साधारण पन्नास वर्षांनी उखडून टाकली जातात. कारण त्यातले उत्पादन घटते, असे सांगण्यात येते. मात्र, मजियानच्या या मळ्यात 100 वर्षांपूर्वीची रोपे जपली आहेत.